न्हावरे, ता. ३ ः आंबळे (ता. शिरूर) येथील शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वनविभागाच्या वतीने शेतातील बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
येथील प्रकाश बेंद्रे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपरिमंडल अधिकारी भानुदास शिंदे यांना मिळताच नियतक्षेत्र वनअधिकारी गणेश झिरपे, वनविभाग रेस्क्यू पथकातील सदस्य शरद गदादे, सुधीर शितोळे, शेरखान शेख, गणेश टिळेकर, संदीप गव्हाणे, अमोल कुसाळकर, शुभांगी टिळेकर यांनी या ठिकाणी धाव घेत प्रकाश बेंद्रे, मुकुंद भिवरे यांसह आदींच्या उपस्थितीत बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले. बिबट्याच्या बछड्यांना त्यांच्या आईच्या पुनर्मिलनासाठी शेतात सुरक्षित ठेवले असून, परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी व रात्रीच्या वेळी शेतात फिरू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
02486
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.