पुणे

नरभक्षक बिबट्यामुळे मृत्यूची छाया गडद

CD

नवनाथ भेके : सकाळ वृत्तसेवा
निरगुडसर, ता. ४ : जुन्नर वनविभागात बिबट्यांच्या डरकाळ्यांनी थरकाप उडत आहे. बिबट्या दिवसाढवळ्या माणसांवर हल्ले करीत आहेत. परंतु त्यावर उपाययोजना करण्यात सरकारची यंत्रणा पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्याने २१ जणांचा जीव घेतला असून, ४३ जणांवर जीव घेणे हल्ले केले आहेत. त्याने २५ वर्षांत ५५ जणांचा बळी घेतला तर १४८ जणांना जखमी केले आहे. जुन्नर वनविभागात बिबट्या नरभक्षक होऊ लागल्याने मृत्यूची भीतीची छाया अधिक गडद होऊ लागली आहे.

जुन्नर वनविभागात जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड तालुके येतात. येथील ऊसशेतीमुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. शिकार आणि पाणी जवळ उपलब्ध झाल्याने बिबट्याची उसाच्या फडातील डरकाळी वाढली आहे. शेळी, मेंढी, वासरे, कुत्री याबरोबर आता मनुष्यावर हल्ले वाढले आहेत. यामध्ये लहान मुलांना बिबट्याकडून भक्ष केले जात आहेत.


नसबंदी करून संख्येवर नियंत्रणाची गरज
जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे एक चिमुकल्यांचा व शिरूर तालुक्यातील जांबूत, पिंपरखेड येथे २० दिवसांत दोन लहान मुले आणि एका आजीचा जीव बिबट्याने घेतला आहे. यामुळे बिबट्या आता नरभक्षक होऊ लागला आहे. जुन्नर वनविभागात बिबट मादींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर तातडीने निर्णय होणे गरजेचा आहे. मादींची नसबंदी करून संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नरभक्षक बिबट्यांचे कायम स्वरुपी स्थलांतर होण्याची गरज आहे.


सरकारकडून या यंत्रणा पुरविण्याची गरज
- जुन्नर वनविभागात बिबटे पकडण्यासाठी १००० पिंजरे आवश्‍यक
- बिबट्याला पळवून लावण्यासाठी एआय मशिन,
- कोणत्याही प्राण्याची हालचाल टिपण्यासाठी अनायडर मशिन,
- सोलर झटका मशिन, स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्स आदी सेवासुविधा


पिंजरे बनवण्याचे काम कासव गतीने
बिबट्यांना पकडण्यासाठी जुन्नर वनविभागात अवघे २०० पिंजरे आहेत. नव्याने २०० पिंजऱ्यांना मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात विभागीय आयुक्तांच्या खर्च परवानगीचे पत्र अद्याप जुन्नर वनविभागाला न मिळाल्याने २०० पिंजरे अद्याप कागदावरच आहे. विभागीय आयुक्तांना दोन कोटी रुपयांचा खर्चाची परवानगी असते परंतु जुन्नर वनविभागाला दोन कोटी खर्चाची परवानगी मिळाली नसल्याने पिंजरे बनवण्याचे काम कासव गतीने सुरू आहे.फक्त १७ पिंजरे नव्याने तयार करण्यात आले आहे.


दृष्टिक्षेपात जुन्नर वनविभाग
२००........ पिंजरे उपलब्ध
१०००........पिंजऱ्यांची गरज


नवीन २०० पिंजऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. परंतु अद्याप पिंजरे खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या परवानगीचे पत्र विभागीय आयुक्तांकडून मिळाले नाही. तरी देखील पिंजरे बनवण्याची ऑर्डर देण्यास सुरवात केली असून १७ पिंजरे तयार झाले आहेत. विभागीय आयुक्तांकडून खर्चाची परवानगी मिळाल्यानंतर पिंजरे बनवण्यास अधिक वेग येईल.
- प्रशांत खाडे, जुन्नर उपवनसंरक्षक

मागील २५ वर्षांतील आकडेवारी
५५...........मृत्यू

१४८......जखमी


मागील पाच वर्षांतील स्थिती
वर्षे.........मृत्यू.........जखमी
२०२१-२२ .........१ .....६
२०२२-२३.........४ .........१२
२०२३-२४ .........३ .........१२
२०२४-२५.........९ .........९
२०२५-२६.........५ .........४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT