पुणे

निरगुडसर येथे बिबट मादी जेरबंद

CD

निरगुडसर, ता. १ ः निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील नहयार मळा येथे सुनील भेके यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात दोन वर्षाची
बिबट मादी जेरबंद झाली आहे. पंधरा दिवसापासून हुलकावणी देणारी बिबट मादी अखेर रविवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसहा वाजता जेरबंद झाली, अशी माहिती वनविभागाने दिली.
परिसरात बिबट्याचा दररोज असलेल्या वास्तव्यामुळे येथील नहयार मळा येथे भेके यांच्या घराजवळ १५ दिवसांपूर्वी वनविभागाने पिंजरा लावला होता. येथील नागरिकांनी पिंजऱ्याची जागा बदल करावी, अशी मागणी केल्यानंतर अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा दिवसापूर्वी जागा बदलली आणि बिबट मादी जेरबंद झाली. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भेके यांच्या उसाच्या शेतात बिबट्या बसलेला नागरिकांनी पाहिले होते.
जुन्नर वनउपसंरक्षक प्रशांत खाडे, अमृत शिंदे, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अश्विनी डफळ आदी रेस्क्यू पथकातील सदस्यांनी बिबट्या जेरबंद करण्यास मदत केली.

02989

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flights: IndiGo संकटात? 200 फ्लाइट्स रद्द, शेअर्स कोसळले… पण सुप्रीम कोर्टात आज नक्की काय घडणार?

farming Success Story:'निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी घेतले डाळिंबाचे उत्पादन'; किलोला दोनशे रुपये दर; माण तालुक्यात क्षेत्र वाढले..

Beed Railway: बीड, आहिल्यानगर रेल्वेसेवेमुळे प्रवाशांना दिलासा

Voter List Error Nashik Incident : मतदार यादीतील गोंधळाचा उत्तम नमुना आला समोर! ; नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांना चक्क मृत दाखवले !

शंभुराजने प्राजक्ताला उचलून घेतलं आणि... लग्नानंतरचा जेजुरीतला नवदाम्पत्याचा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT