पुणे

विवेक वळसेंकडून सलग दुसऱ्यांदा गिरेंचा पराभव

CD

निरगुडसर, ता. ९ : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी-पारगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तीनही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी तयार करून मोठी ताकद तयार केली होती तरी देखील ही सर्व ताकद विवेक वळसे पाटील यांचा विजय रोखू शकली नाही. यामध्ये विवेक वळसे पाटील यांचा २८०७ मतांनी विजय झाला. सलग दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील यांनी अरुण गिरे यांचा पराभव केला आहे.
या गटात दोन माजी उपाध्यक्ष सलग दुसऱ्यांदा समोरासमोर निवडणुकीसाठी उभे होते तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात होते तर समोर शिवसेनेचे अरुण गिरे हे होते. या निवडणुकीत विवेक वळसे पाटील यांचा पराभव करण्यासाठी पारगाव कारखाना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेऊन देखील या सभेचे रूपांतर मतात होऊ शकले नाही.

पराभवाचा वचपा नणंदबाईने काढली भरून
कळंब-चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तुलसी सचिन भोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून प्रीती प्रवीण थोरात या नणंद भावजय यांची लढत सलग दुसऱ्यांदा पाहायला मिळाली,यामध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकीत तुलसी भोर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर प्रीती थोरात या शिवसेना पक्षाकडून लढल्या होत्या त्यावेळी नणंद प्रीती थोरात यांचा १ हजार ८ मतांनी भावजय तुलसी भोर यांनी पराभव केला होता,त्यानंतर या निवडणुकीत पुन्हा एकदा नणंद भावजय निवडणूक रिंगणात समोरासमोर आल्या,यावेळी मात्र मागचा पराभवाचा वचपा नणंदबाईने भरून काढला आणि या निवडणुकीत नणंदबाई प्रीती थोरात यांनी भावजय तुलसी भोर यांचा १५६१ मतांनी पराभव केला ही लढत चांगलीच अटीतटीची झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MHADA Lottery : प्रतिक्षा संपली ! पुणे म्हाडाची ४,१८६ सदनिकांची सोडत आज, पुण्यात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न होणार साकार

Latest Marathi News Live Update : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; यंदा १५ लाख ३२ हजार विद्यार्थी रिंगणात

Nitin Gadkari : पंचगंगा नदीवर 913 कोटींचा सहा पदरी पिलर उड्डाणपूल; गडकरींकडून प्रस्तावास मंजुरी, कागल-सातारा महामार्गाचे भाग्य बदलणार!

राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, मुख्यमंत्री फडणवीस नवी पद्धत अवलंबणार

Pandharpur Election Results: पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी; भाजपसह परिचारक गटाला धक्का, कल्याणराव काळे, गणेश पाटील यांना नाकारले!

SCROLL FOR NEXT