नीरा नरसिंहपूर, ता. ५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश बावडा, पिंपरी बुद्रुक, नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे दर्शनासाठी आणण्यात आला. त्यानंतर बोटीमध्ये अस्थिकलश ठेवून भीमा व नीरा नदीच्या संगमाच्या पाण्यात अस्थिकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी अस्थिकलशावर विधी करण्यात आला.
दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश गोपाळ डेअरी (बावडा), ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी बुद्रुक व ग्रामपंचायत कार्यालय नीरा नरसिंहपूर येथे काही वेळ दर्शनासाठी ठेवण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना दादांनी केलेल्या कामांच्या आठवणी दाटून आल्या. तसेच, राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाकांक्षी असलेल्या तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानला ब दर्जा देऊन वेळोवेळी आर्थिक तरतूद करून या तिर्थक्षेत्राची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी सातत्याने घेतलेला पुढाकार, तसेच येथील दर्जेदार कामासाठी त्यांचा स्पष्टपणा, कामासाठी त्यांनी वक्तशीरपणाने दिलेला वेळ, अशा अनेक आठवणींनी नरसिंहपूरकरांना अक्षरशः गहिवरून आले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, संग्रामसिंह पाटील, सचिन सपकळ, नवनाथ रूपनवर, अतुल झगडे, श्रीकांत दंडवते, शिवाजी मोहिते, सोमनाथ मोहिते, नरहरी काळे, गौरव दंडवते, संगीता दंडवते, जगदीश सुतार आदींसह अनेकांनी दर्शन व श्रद्धांजली वाहिल्यानंतर अस्थिकलशाचे भीमा व नीरा नदीच्या संगमाच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.
05335
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.