ओतूर, ता. २८ : ओतूर (ता. जुन्नर) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०५वी जयंती अण्णा भाऊ साठे तरुण मित्र मंडळ, प्रगती उषा किरण उन्नती महिला बचत गट व अखिल मातंग समाज चळवळ यांच्यावतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अतुल बेनके होते. ओतूर शहरात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. या कार्यक्रमामध्ये विविध गावांमधून सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या केलेल्या कार्याचा सत्कार केला. तसेच, पुणे येथील संगमवाडीच्या लहुजी वस्ताद स्मारक समितीचे शासकीय अध्यक्ष अशोकराव लोखंडे, सकल मातंग समाजाचे समन्वयक भास्कर नेटके व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नीता अल्हाट यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विनायक तांबे, ओतूरच्या सरपंच डॉ. छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, माजी सभापती विशाल तांबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अनुराग फापाळे, तानाजी तांबे, वाघिरे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, अहिल्यानगरचे मातंग आघाडीचे अध्यक्ष रमेश वायदंडे, विराट प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप सरोदे, लहुजी शक्ती सेनेचे विकास जाधव, युवा अध्यक्ष लहुभाऊ खंडागळे, अखिल मातंग चळवळीचे गजानन राजगुरू, सतीश पंचरास, राजू पंचरास, चेतन साळवे, ‘वंचित’चे प्रदीप सरोदे, सागर पवार, जावेद मोमीन आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अमित अस्वार, सचिन कसबे, वैभव अस्वार, संतोष अस्वार, आतिश गायकवाड, सनी ठोसर, संकेत अस्वार, गणेश अस्वार, अलका अस्वार, जनाबाई अस्वार, जय श्रीराम मालनस्वार, कमल माळवे, प्रतिभा पवार, उज्ज्वला माळवे, नंदा भालेराव, पूनम पाले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी सूत्रसंचालन केले. योगेश अस्वार यांनी आभार मानले.