पुणे

सह्याद्रीच्या कुशीत ‘शांताक्का’ ठरल्या आधारवड

CD

पराग जगतापः सकाळ वृत्तसेवा
ओतूर, ता. २६ ः सह्याद्रीच्या डोंगर रांगात उंच डोंगर शिखरावर वसलेल्या कोपरे मांडवे मुथाळणे या दुर्गम आदिवासी भागात उदापूरकडून जाणाऱ्या मार्गावरील मुथाळणे घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या मांदारणे (ता. जुन्नर) गावच्या साबरवाडीतील आदिवासी ठाकर समाजाच्या शांताबाई चंदर जाधव (शांताक्का) या वयाच्या ९२व्या वर्षीही गर्भवती महिलांचे सुखरूप प्रसूती एक सेवा भाव म्हणून करत आहेत. आता साधणे मुबलक झाली, रस्ते झाले, गाड्या- घोड्या झाल्या, मात्र आधीच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना शांताक्काने दिलेली सेवा विसरता येणार नाही.

आदिवासी ठाकर समाजाच्या असलेल्या शांताबाई जाधव या अशिक्षित आहेत. त्या खऱ्या अर्थाने वयाच्या १२व्या वर्षापासून सुईण म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या आईला मदत करत. त्यांनी सुईणीचे काम आईकडून जाणून घेत त्यात कौशल्ये आत्मसात केले. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या की गावागावातून, वाड्यावस्त्यांतून शांताक्काला न्यायला लोक येत. कारण सोयीसुविधांची अभाव आणि घरातील महिलेची सुखरूप प्रसूती त्या करतील याची खात्री लोकांना असत. शांताक्काच्या भाषेत सांगायचं झालं तर बाळंतीण सुखाची झाली म्हणजे नैसर्गिकरित्या ती बाळंत झाली हे अधोरेखित झालं. सुईणीच्या या त्यांच्या कामाचा त्यांचा लहानपणापासून आईसोबत केलेला प्रवास पाहता आतापर्यंत त्यांनी १० हजार पेक्षा जास्त गरोदर महिलांच्या सुखरूप प्रसूती केल्या आहेत. विशेष म्हणजे एकदाही बाळंतीण किंवा बाळ प्रसूतीदरम्यान दगावल्याचा त्यांना अनुभव नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या गर्भवती महिलांच्या सुखद, नैसर्गिक प्रसूती करण्याच्या अनुभवाची पंचक्रोशीत ख्याती असल्याने त्यांच्यावरील विश्वासही जनमानसात दृढ झालेला आहे. त्याच्या सुईणीच्या कामामुळे समाजात त्या सर्वांच्या शांताक्का म्हणून ओळखल्या जातात.

साबरवाडीत त्यांचं पत्र्याचं छोटंसं घर, त्यात त्यांची दोन मुलं, नातवंडं आणि पतवंडे असा घरातला कौटुंबिक गोतावळा. त्यांचं लहानपण एकल माता असलेल्या त्यांच्या आईच्या सानिध्यात गेले. कारण, त्यांच्या बालपणीच भिंत अंगावर पडून त्यांचे वडील गेले. मग सुईण म्हणून काम करत, गुजराण करणाऱ्या त्यांच्या आईला, लहानपणापासून त्यांनी सूईणीच्या कामासाठी मदत करण्यास सुरुवात केली. आईच्या मार्गदर्शनाखाली गरोदर महिलेच्या प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर बाळाचा नैसर्गिकरित्या जन्म होण्यासाठी, संबंधित महिलेचं पोट कसं चोळायचं आणि त्यातून सामान्यपणे बाळंतपण कसं पार पाडायचं याचा जणू मोठा अनुभव त्यांनी त्यांच्या पदरी पडत गेला. यातूनच बाळंतपण करण्याचा त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत राहिला.
जुन्नर तालुक्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, ओतूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतूळ, तसेच ज्या- ज्या ठिकाणी यासाठी त्यांना बोलावलं जातं. तेथे सुरुवातीला पायी जाऊन, कधी बैलगाडीतून जाऊन बाळंतीणीची सुटका करण्याचं काम त्या करत राहिल्या. ज्या वेळी टेम्पो, टॅक्सी सारखी वाहने ग्रामीण भागात आली, तशी त्यांना प्रसूतीसाठी गाडीने न्यायला लोक येवू लागले. पण या सगळ्या त्यांच्या सुईणीच्या प्रवासमार्गात कोणी त्यांना १० रुपये दिले, कधी ५० रुपये दिले, कधी कोणाकडून काही मिळालं नाही, काही वेळा खोबरं वाटीने त्यांची भरलेली ओटी हीच त्यांची या कामाची बिदागी होती. तरी त्यांनी ते स्वीकारत त्या चालत राहिल्या. कधीही कोणाची पैशासाठी अडवणूक केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने अडल्या- नडल्या गोरगरीब कुटुंबांसाठी त्यांचा सेवाभावाचा प्रांत कायमच दिलासा देत राहिला.

रस्ते नव्हते, प्रवासाला साधन नव्हती, कोणी पायी तर कोणी बैलगाडी घेऊन यायचं, अडलेली बाई असल्यावर मी घाईने जाऊन बाई मोकळी करायचे. कधी- कधी एका दिवसात तीन- चार बाळंतपण केली आहेत. इतक्या वर्षात कित्येकांच्या दोन- दोन, तीन- तीन पिढ्यांची बाळांतपण मी सुखरूप केली आहेत. आता मी बाहेर जात
नाही. सिस्टरपण मला हे काम करू नका म्हणून बोलतात.
- शांताबाई जाधव, सुईण

चार महिन्यांपूर्वी माझ्या लहान भावाची बायको वृषाली हरीश भले हिला बाळांतपणात अडचण आली होती, म्हणून डॉक्टरांनी मोठ्या दवाखान्यात पुणे येथे न्यायला सांगितले होते. आम्ही तीला घरी आणले, मात्र दोनच दिवसात शांताक्काने तिची घरीच नैसर्गिक बाळंतपणकेले.
- दीपक भले

00804

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : दौरे थांबवा, अडथळे येतील; शरद पवार यांचे मंत्री, लोकप्रतिनिधींना आवाहन

Sakal Relief Fund : पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात; ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ दुसऱ्या दिवशीही सुरू

Maharashtra Red Alert : राज्यातील बावीस जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rohit Pawar : ‘’मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला...’’ ; रोहित पवारांनी साधला निशाणा!

Finance Ministry New Address: अर्थ मंत्रालयाला नवे घर मिळणार, नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडणार, 'या' भवनात नवा प्रवास सुरू करणार

SCROLL FOR NEXT