ओतूर, ता. ४ : जुन्नर तालुक्यातील मढ खोऱ्यात व माळशेज खोऱ्यात आणि कोपरे मांडवे मुथाळणे खोऱ्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत दररोज पडणाऱ्या पावसामुळे भात काढणीची कामे ठप्प झाली आहेत. पावसामुळे भात काढणी लांबली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने भात उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर भातावर करपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. कसे बसे भात उत्पादक शेतकऱ्यांनी भात पीक जगवून वाढवले. आता भात ते काढणीस आले असून, वाया गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पडतच आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शासनाने पंचनामे करावे, अशी मागणी माजी पोलिस पाटील देवराम डावखर, संदीप घोडे, सोमनाथ निसरड, पिनू निसरड, आशा डावखर, जयराम मेणे अशोक घोडे यांनी तसेच वाटखळ येथील विश्वनाथ घोलप, राजू साबळे, विकास घोडे, शांताराम घोडे, कमा घोडे यांनी केली आहे.
अशी आहे स्थिती
- दररोजच्या पावसाने खाचरात साचून राहते पाणी.
- बहुतांश ठिकाणी भाताची पीक आडवे
- भाताच्या लोंब्यातून दाणे झडून पाण्यात पडत आहेत.
- सततच्या पावसामुळे भात कापणी करता येईन.
- पाणी साचल्याने भात कापून ठेवावायला जागा नाही.
भाताच्या पिकावर ९० टक्के शेतकरी अवलंबून
जुन्नर तालुक्यातील मढ खोरे, माळशेज खोरे, कोपरे मांडावे खोऱ्यामधील गावातील भात उत्पादक शेतकरी या वर्षी भात काढणी रखडल्याने चांगलाच अडचणीत सापडला आहे.
मढ, माळशेज व कोपरे मांडवे मुथाळणे या प्रमुख खोऱ्यांत भात उत्पादक मोठ्या प्रमाणात होत असून ९० टक्के शेतकरी भाताच्या पिकावर अवलंबून आहे.
भात काढणीला आले आहे. मात्र, पावसामुळे भात पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भात पिकांचे निम्या पेक्षा जास्त नुकसान होणार आहे.
- कुंडलिक सदाकाळ, मढ, (ता. जुन्नर)
सततच्या पावसामुळे भात पिकांची गुणवत्ता खराब होणार असून, उत्पादनात ही घट होणार असल्याने भात पिकांचे त्वरित पंचनामे करून सरकारने भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.
- गोविंद साबळे, सरपंच, तळेरान (ता. जुन्नर)
00988
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.