ओतूर, ता. २३ : ओतूर (ता. जुन्नर) येथील मेन बाजारपेठेतील स्वप्नदृष्टांत मंदिरामध्ये शुक्रवारी (ता. २३) संत तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम झाल्याची माहिती राम घाटकर, कृष्णा घाटकर यांनी दिली.
ओतूर येथे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या आणि संतश्रेष्ठ जगदगुरूंच्या अनुग्रह भूमीतील स्वप्नदृष्टांत मंदिरामध्ये जानू तेली यांच्या बखळीमध्ये जिथे तुकाराम महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला आणि स्वप्नात रामकृष्ण हरी मंत्र मिळाला तेथे निर्माण करण्यात आलेल्या स्वप्नदृष्टांत मंदिरामध्ये संत तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात धार्मिक कार्यक्रमांने साजरा करण्यात आला.
जुन्नर तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम महाराज डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला. सकाळी साडेआठ वाजता अभिषेक, सकाळी दहा ते बारा वाजता जन्माचे भजन, दुपारी बारा वाजता जन्म सोहळा व आरती, राम कृष्ण हरी मंत्राचा सामुहिक जप करण्यात आला. त्यानंतर दुपारी साडेबारा नंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या जन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन स्वप्न दृष्टांत तुकाराम महाराज परिवार, व्यापारी असोसिएशन, मेन बाजारपेठ, संताजी गणेश मंडळ, नवचैतन्य गणेश मंडळ, ग्रामस्थ ओतूर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.