पुणे

कुमशेत येथे बिबट्या जेरबंद

CD

ओझर, ता.२७ : कुमशेत (ता.जुन्नर) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सिद्धार्थ केदार या सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी पाच ते सहा कर्मचाऱ्यांसह दहा पिंजरे आणि पाच ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यातील एका पिंजऱ्यात शनिवारी पहाटे बिबट्या अडकल्याचे दिसून आले. तो नऊ ते दहा वर्षे वयाचा नर आहे. तो घटनास्थळापासून दूर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
दरम्यान कुमशेत परिसरात व घटनास्थळी आणखी काही बिबटे जोडीने वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने नेमका हाच नरभक्षक बिबट्या आहे का? याबाबत वनविभाग व नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी नागरिक करत आहेत. वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच नरक्षक बिबट्या बाबतचा खुलासा होईल, असे सरपंच रवींद्र डोके यांनी सांगितले.
गावात आणि परिसरात जाधव वस्ती, वाणीमळा तसेच स्मशानभूमी परिसरात आणखी काही ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

01686

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Eknath Shinde : अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Parli Vaijnath News : तालुक्यात आभाळ फाटले, तीन मंडळात अतिवृष्टी; गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले, शेतातील पिकांत पाणीच पाणी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

SCROLL FOR NEXT