पुणे

पाबळ येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’

CD

पाबळ, ता. २० : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (ता. १९) शिबिर पार पडले. महिलांच्या आरोग्याबाबत विविध तपासण्या, मार्गदर्शन, आहार व पोषणविषयक जनजागृती अशा उपक्रमांचा यात समावेश होता.

या शिबिरात तब्बल २५० महिलांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत तपासणीसह गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतिपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, हिमोग्लोबिन, क्षयरोग, सिकल सेल तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विशेष तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. पोषण, मासिक पाळी स्वच्छता, निरोगी जीवनशैली याबाबत महिलांना माहिती देण्यात आली. तसेच, टेक होम राशन (THR) चे वाटप, माता-बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्यमान वय वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड यांची नोंदणी केली.
शिबिरादरम्यान शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कार फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांना बिस्कीट पुडे व चिक्कीचे वाटप केले. या शिबिराचे नियोजन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांनी केले. यावेळी शरद बँकेचे संचालक अजय घुले, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, सरपंच सोपान जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरडे, डॉ. उधाणे, डॉ. शिंदे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, हे शिबिर पुन्हा एकदा २६ सप्टेंबर रोजी पाबळ ग्रामीण रुग्णालयात होणार असून त्यावेळी नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व अवयव दान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. धस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul price cut News : ‘अमूल’ने घेतला मोठा निर्णय! तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किंमतीत केली घट

Dandiya Function : कोल्हापुरात नवरात्रोत्सवात रास दांडिया खेळण्यासाठी जय्यत तयारी, विविध ठिकाणी होणार कार्यक्रम; इथे उत्साह वाढवा

Motala Crime : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये विवाहितेचा विनयभंग; पुण्यावरून येताना घडली घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Smriti Mandhana: स्मृती मानधनाने मोडला Virat Kohli चा मोठा विक्रम! भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंनाही नाही जमला असा पराक्रम केला

Latest Marathi News Live Update : माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT