पुणे

स्मशानभूमीत स्थिरावलेली कान्हूरची मेसाई देवी

CD

पाबळ, ता. २५ : राज्यातील अनेक घराण्यांचे कुलदैवत आणि तालुक्याची ग्रामदेवता म्हणून ओळख असलेल्या मेसाई देवीच्या मंदिरात नवरात्रानिमित्त कुलधर्म आणि कुलाचारासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
हेमाडपंथी शैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर भक्ती-शक्तीचे प्रतीक मानले जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती लाभलेल्या देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक दाखल होत आहेत. नक्षीदार प्रवेशद्वार, कळसावरील रंगकाम आणि प्रशस्त सभामंडप मंदिराचे सौंदर्य अधिक खुलावतो. गाभाऱ्यासमोर कोरलेले सिंहाचे शिल्प, मोठ्या घंटा आणि वस्त्रालंकारांनी सजविलेल्या देवीच्या आकर्षक रूपामुळे परिसरात प्रसन्नता आणि मंगलमय वातावरण पसरते.
मंदिरात दोन भव्य मूर्ती असून, एक मूर्ती मेसाई देवीची तर पाठीमागील मूर्ती महिषासुर मर्दिनीची आहे. गावाच्या चारही बाजूंना अष्टभैरव मंदिरे आहेत. स्मशानभूमीत स्थिरावलेली ही देवी ‘स्मशाननिवासिनी’ म्हणूनही ओळखली जाते. विशेष म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश करून पूजा-अर्चा करण्याचा मान केवळ विधवा स्त्रियांनाच मिळतो. इतर भाविकांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. नवरात्रोत्सवात विधीवत घटस्थापना करून मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजविण्यात आला आहे. पुणे, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, ठाणे, इगतपुरीसह राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दाखल होतात.
नवरात्रानिमित्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यंदा या परंपरेचे ५३ वे वर्ष आहे. हरिपाठ, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, कीर्तन, हरी जागर यांसारखे धार्मिक कार्यक्रम सुरू असून विजयादशमीच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मेसाई देवी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी दिली.

कसे याल?
• पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथून हिवरे कुंभार-खैरेवाडी-कान्हूर मेसाई-मेसाई देवी मंदिर (१८ किमी)
• पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर-पाबळ-खैरेनगर-कान्हूर मेसाई-मेसाई देवी मंदिर (३० किमी)
• शिरूर येथून आमदाबाद फाटा-मलठण-कान्हूर मेसाई-मेसाई देवी मंदिर (बसस्थानकावरून एसटीची सोय आहे.) (२८ किमी)

जवळील पर्यटन स्थळे
• चिंचोली मोराची येथे पर्यटन केंद्र व मोरांचे वसतिस्थान (५ किमी)
• कवठे येथील येमाई देवी मंदिर (१० किमी)
• टाकळी हाजी (ता. शिरूर)- निघोज (ता. पारनेर जि. अहिल्यानगर) येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे व मळगंगा माता मंदिर (२६ किमी)
• पाबळ येथील मस्तानीची कबर (स्मृतीस्थळ) (११ किमी)
• रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिर (२१ किमी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

SCROLL FOR NEXT