पुणे

पाबळ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव

CD

पाबळ : येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा समाधानकारक असली तरी आवश्यक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णालयातील अनेक विभाग बंद आहेत. दिवसाला तब्बल १२५ ते १५० रुग्णांची तपासणी होत असून वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण समाधानी आहेत.
पाबळ (ता. शिरूर) येथे सुमारे पाच एकर जागेत ग्रामीण रुग्णालयाची नवीन भव्य इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, त्यातील फर्निचरचे कामकाज अद्याप प्रलंबित आहे. यासाठी सुमारे १ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर झाला असून कामाला गती मिळणे आवश्यक आहे. इमारतीच्या छताची काही ठिकाणी गळती होत असल्याने त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. रुग्णालयात पाण्याची मोठी समस्या असल्याने रुग्णालयात व परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. ग्रामपंचायतीमार्फत दर तीन-चार दिवसांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रुग्णालयाच्या परिसरात गवत वाढले असून अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन धस यांच्याकडे पाबळ रुग्णालयाचा मूळ पदभार असूनही ते रुग्णालयात नियमित हजर राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता पाबळसह, शिरूर व मंचर येथील नेत्र विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने पाबळ रुग्णालयात नियमित हजर राहता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहायक अधीक्षकही नियमित हजर नसल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाचा कार्यभार सांभाळत आहेत. सध्या रुग्णालयात ३ वैद्यकीय अधिकारी, ७ परिचारिका, ४ सेवक, २ सफाईगार, १ औषध निर्माण अधिकारी, अधीक्षक, सहायक अधीक्षक व १ लिपिक ही पदे कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत असून आरोग्यसेवा समाधानकारक आहे, परंतु तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, आवश्यक पुरेशा सुविधांचा अभाव असल्याने महत्त्वाच्या उपचारासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. तसेच अपुऱ्या सुविधांमुळे व मनुष्यबळ नसल्याने येथील शवविच्छेदन गृह बंद असून परिसरात झाडे झुडपे उगवली आहेत.

हे विभाग बंद
प्रसूती
शस्त्रक्रिया
एक्स-रे
शवविच्छेदन

ही पदे रिक्त
स्त्रीरोग तज्ज्ञ
भूल तज्ज्ञ
बालरोग तज्ज्ञ

पाबळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना दिल्या जातील. तसेच लवकरच पाबळ व परिसरातील ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

- डॉ. भगवान पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे विभाग

1541

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT