पुणे

मूलभूत सुविधांच्या चक्रात अडकली आरोग्यसेवा

CD

पाबळ, ता. १८ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीस डागडुजीची आवश्यकता आहे. येथे मूलभूत सुविधांचा अभाव आणि रिक्त पदांमुळे पशूधनांच्या आरोग्यसेवेचे चक्र अडखळले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पशुधनांच्या उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दवाखान्याअंतर्गत कान्हूर मेसाई, खैरेवाडी, मिडगुलवाडी, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा समावेश आहे. येथील दवाखान्याला संरक्षण भिंत नसल्याने व पाण्याची गैरसोय असल्याने आजूबाजूचा परिसर अस्वच्छ झाला आहे. दवाखान्यातील कामकाजाबाबत शेतकरी काही प्रमाणात समाधानी असले, तरी येथे कार्यरत असलेल्या पशुधन पर्यवेक्षकांना दोन ठिकाणांचा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत असून, त्यांच्याकडे १३ गावे आहेत. त्यामुळे त्यांना सेवा पुरविताना कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या सुविधांअभावी शेतकऱ्यांना पशुधनांवरील उपचारासाठी खासगी दवाखान्यांचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे.

यांची आहे गरज
- एक्स-रे सह
- अत्यावश्यक उपचार सुविधा


पशुधन संख्या
गाई..........१३१२
शेळी..........१२३७
मेंढी..........५१९
म्हशी..........२७५

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
वंध्यत्व निर्मूलन संख्या........२४५
कृत्रिम रेतन संख्या..........२२४
गर्भधारणा तपासणी....१९९

लसीकरण
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी).......... १६७०
लाळ्या खुरकूत ..........१६००
लंपी.......... १५००
घटसर्प...८००
फऱ्या...१००
रेबीज..........१४


परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी..........१३
थायलेरिया..........००

वैरण बियाणांसाठी ५० पुशपालकांनी अर्ज केले आहेत.


चारा उत्पादन क्षेत्र..........९६८ हेक्टर
गावातील सिंचित ओलिताखाली क्षेत्र....७२४ हेक्टर

वार्षिक चारा (टनांत)
हिरवा....९० ते ९५
वाळलेला..... १५००


दवाखान्यातील रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी - १
परिचर - १

कान्हूर मेसाई सह मलठण व कवठे येमाई येथे अतिरिक्त पदभार आणि कर्मचारी अभावामुळे सेवा देण्यात मर्यादा येत आहेत. तरीही
शेतकऱ्यांच्या पशुधनांना आवश्यकतेनुसार गोठ्यावर जाऊन उपचार
देण्याचा आणि उपलब्ध संसाधनांत उत्तम सेवा पुरविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
- अनिल सूर्यवंशी, पशुधन पर्यवेक्षक, कान्हूर मेसाई


कान्हूर मेसाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कामकाज समाधानकारक असले तरी इमारतीची किरकोळ डागडुजी, संरक्षण भिंत आणि पूर्णवेळ पशुधन विकास अधिकारी नियुक्ती अत्यावश्यक आहे. येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना खासगी उपचाराचा खर्च टाळता येऊन अधिक दर्जेदार सेवा मिळतील.
- शहाजी दळवी, शेतकरी
01570

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT