पुणे

कवठे येमाईत बिबट मादी जेरबंद

CD

कवठे येमाई, ता. ५ : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेशनगर परिसरात रविवारी (ता. ४) शेतकरी गणपत बाळासाहेब तावरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन लहान बछडे आढळून आले. दुरावलेल्या बछड्यांची व त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने गणेशनगर परिसरात पिंजरा लावला. या पिंजऱ्यात सोमवारी (ता. ५) पहाटेच्या सुमारास अंदाजे पाच वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली. यानंतर वनविभागाने दुरावलेल्या बछड्यांची व त्यांच्या आईची भेट घडवून आणली. अखेर बछडे आईच्या कुशीत विसावल्याने उपस्थित नागरिकांनी व वन अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कवठे येमाई गावठाणासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच उसाच्या शेतात बछडे आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट मादी पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनरक्षक नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड तसेच रेस्क्यू टिमच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेल्या बिबट मादीसह दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचे वनरक्षक नारायण राठोड यांनी सांगितले. बिबट मादी जेरबंद झाल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, परिसरात आणखी बिबटे असल्याची शक्यता व्यक्त होत असून, वनविभागाने गावठाणासह वाड्या-वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार या सिंहाचा आणि अजित पवार या वाघांचा वारसा सांगणारा-आमदार अमोल मिटकरी

Sunset Destinations: 'Sunset Lovers' साठी भारतातील हे 4 हॉटस्पॉट्स, एकदा नक्की भेट द्या!

SCROLL FOR NEXT