पुणे

‘कुंडेश्वर’ नव्याने उदयास आलेले पर्यटन स्थळ

CD

कुंडेश्वर डोंगरवर निसर्ग देवतेचे वरदान लाभलेले सुंदर असे भगवान महादेवाचे श्रद्धेय स्थळ आहे. मनाला निखळ आनंद, समाधान आणि नवी ऊर्जा देणारे हे पर्यटन आणि तीर्थस्थळ आहे. कुंडेश्वर हे पुणे-नाशिक महामार्गापासून खेड तालुक्याच्या पश्चिमेला १८ किलोमीटर अंतरावर व कोहिंडे बुद्रुक व पाईट गावच्या शिवेलगत एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. खेड तालुक्यातील पाईट, कोहिंडे बुद्रुक, तळवडे, वाशेरे, हेद्रुज या गावांच्या मधोमध हा डोंगर आहे.

पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगर कड्यांवरून फेसळणारे धबधबे, संपूर्ण गर्द हिरवाई, रानवाऱ्यासोबत हळुवार डोलणारी हिरवीगार शेती, बैलांच्या गळ्यातील घुंगरू माळांचा आवाज, वनौषधी, रानभाज्यांनी समृद्ध डोंगर, धुक्‍याने वेढलेला शांत परिसर, भर उन्हाळ्यात देखील थंडगार हवेची अनुभूती देणारा, अतिशय देखणा आणि आल्हाददायक वातावरण या भागाला लाभले आहे. गेली अनेक वर्षे हे ठिकाण दुर्लक्षित होते. मात्र, मंदिर ट्रस्ट, भाविक-भक्तगण, पुणे जिल्हा परिषद, वनविभाग यांच्या पुढाकाराने या भागाचा विकास सुरू आहे. कुंडेश्वर मंदिर हे पाच गावांचे नोंदणीकृत ट्रस्ट असून २२ एकरांचा परिसर या देवस्थानकडे आहे. या बावीस एकरांच्या सभोवताली सर्व वनखात्याचे क्षेत्र असून ते विविध वृक्षवेलींनी नटलेले आहे. याठिकाणी १५० हुन अधिक दान केलेल्या गावरान गाईचा वावर असून त्यांचे संगोपन व संवर्धन ट्रस्टमार्फत मंदिर परिसरालगत केले जाते, हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
 
धुक्यात हरवते डोंगर
ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी (स्थानिक वाटाड्याचे मार्गदर्शन घेऊन) इथे मोठा वाव असून डोंगराच्या पूर्व बाजूला वनदेव मंदिर आणि विस्तीर्ण जंगल आहे. या बाजूला डोंगराला अतिशय मोठा कडा असून हा परिसर अतिशय विलोभनीय आहे. कुंडेश्वर मंदिराच्या पश्चिमेला मोठा हिरवागार डोंगर असून संपूर्ण मातीच्या डोंगरावर गर्द हिरवाईमध्ये पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेता येतो. अनेक वेळेला या डोंगरावरती धुके असते. या उंच डोंगरावरून सूर्यास्ताचे अनेक मनमोहक क्षण अनुभवता येतात.

‘क’ वर्ग दर्जा
भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांच्या विशेष प्रयत्नाने या मंदिराचा कायापालट झाला असून तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट यांनी ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्याने या ठिकाणी पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय, सर्व सुविधायुक्त भक्त निवास, कुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालय, मंदिर परिसर भिंत बांधकाम, गोशाळा शेड, मंदिर परिसर सुशोभीकरण, पार्किंगची व्यवस्था (बस थांबा ), पिण्याच्या पाण्याची टाकी, पाणपोई, पाण्याची खडक टाकी, ओपन जिम (पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सहकार्याने), स्वच्छतागृह, मंदिर परिसरात पेव्हीग ब्लॉक, कोमलवाडी पाईट ते श्रीक्षेत्र कुंडेश्वर सर्व रस्ते व अवघड घाट रस्ते रुंदीकरण करून काँक्रिटीकरण, डांबरीकरण या सुविधा सुमारे तीन कोटी निधी खर्च करून करण्यात आले आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू
वनविभागाने देखील याभागात उंच मनोरे, पॅगोडा बैठक व्यवस्था आदी सुविधा केल्या असून येत्या काही महिन्यांत गार्डन आणि इतर अनेक सुविधा वनविभाग करणार आहे. सध्या कुंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून तब्बल एक कोटी रुपये खर्च करून या परिसरातील भाविक अतिशय देखणे मंदिर उभे राहत आहे. कुंडेश्वर मंदिर परिसरात निखळ शांतता, सुंदर निसर्ग आणि थंड हवा अनुभवण्यासाठी पर्यटकांना हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात खुणावत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT