पुणे

श्रीरामपूर हल्ल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगरला वकिलांचा मोर्चा

CD

पाईट, ता. ५ : श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथील न्यायालयात ॲड. दिलीप दत्तात्रेय औताडे यांच्यावर सुनावणीदरम्यान झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी सोमवारी(ता. ४) खेड उपविभागीय अधिकारी, खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. आरोपीला कठोर शिक्षा करावी, वकिलांवरील हल्ला विरोधी कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करीत उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांना मागण्याचे निवेदन दिले.
सत्र न्यायालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चात वकील बांधवांनी जोरदार घोषणा देत सदर घटनेबाबत संतप्त भावनाही व्यक्त केल्या. या मोर्चामध्ये राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे ॲड. वैभव कर्वे, ॲड. शंकर कोबल, ॲड. स्वरूपा कोतवाल, ॲड. नवनाथ कड, ॲड. शुभम गाडगे, ॲड. साक्षी राक्षे, ॲड. केदार गुरव, ॲड. सिद्दिका लांडगे, ॲड. दीपक थिगळे, ॲड. संकेत वाघमारे, ॲड. सूरज राळे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS Vijayadashami event : सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या विजयादशमी सोहळ्यात होणार सहभागी, मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण...

Sanjay Rathod : 'साहेब, जेवणसुद्धा गोड लागत नाही हो...'; हदगावमध्ये मंत्री संजय राठोडांसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

Indian Railways Diwali Bonus 2025: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर; जाणून घ्या किती दिवसांत खात्यात जमा होणार?

Family Farmland Dispute : भावकीतील वादात एकमेकांची जिरवाजिरवी, शेतजमीनींचे तंटे मिटता मिटेनात; सरकारी योजना कशी चालेल?

Amazon Great Indian Festival 2025: अ‍ॅमेझॉनवर टीव्ही, एसीसह हजारो वस्तूंवर जीएसटी बचत आणि जबरदस्त सूट; जाणून घ्या ऑफर्स

SCROLL FOR NEXT