पुणे

पाईट सोसाटीची सभा आरोपाने गाजली

CD

पाईट, ता. २६ : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा सचिवाने सुमारे ९०० पेक्षा अधिक इकरार ऑनलाइन नोंदवून देण्याचे चक्क १० पट जास्त पैसे घेतल्याच्या आरोपाने गाजली.
पाईट सोसायटीची वार्षिक सभा अध्यक्ष अनिल डांगले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात मंगळवारी (ता.२३) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रेय जांभळे, संचालक पंडित रौंधळ, रामदास सावंत, विजय करंडे, महेश शेटे, शंकर रौंधळ, ताराबाई बच्चे, दिलीप खेंगले, काशिनाथ सोनवणे, साहेबराव चोरघे यांच्यासह गणेश चोरघे, नवनाथ दरेकर, उत्तम रौंधळ, पांडुरंग बचे व इतरही मान्यवर सभासद, तज्ज्ञ संचालक उपस्थित होते.
सभेत सुरुवातीला सचिव सुनील रौंधळ यांनी अनेक विषयांसह ताळेबंद अहवालाचे वाचन केले. त्यानंतर सोसायटीमध्ये नवीन इकरार ऑनलाइन नोंदविण्यासाठी फक्त १५ ते २० रुपये फी असताना सचिवाने सभासदांकडून चक्क दहापट जास्त पैसे घेतले, असा थेट आरोप उपस्थित संचालक व सभासदांनी सचिवावर केला. जास्त रक्कम घेतल्याचा विषय चर्चिला जात असताना सचिवाने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा विषय आणखी चिघळत असल्याचे लक्षात येताच सचिव यांनी सभेतून पळ काढीत सोसायटीची केबिन गाठली. तेथेही जात घेतलेल्या जादा पैशांचा हिशोब मागण्याचा प्रयत्न सभासदांनी केला पण सचिवाने उत्तर दिले नाही. त्यानंतर इतर संचालक व सभासदांनी सचिवावर प्रश्नांचा भडिमार करताच ‘यापुढे सभासदांकडून पुढे जादा रक्कम घेतली जाणार नाही’, अशी कबुली सचिव सुनील रौंधळ यांनी उपस्थितांना दिली.
या बैठकीत यापुढे पाईट सोसायटीच्या वतीने सभासद शेतकऱ्यांना इकरार व सातबारा मोफत देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनिल डांगले यांनी सांगितले. सोसायटीच्या मासिक सभेत सर्व संचालकांनी सचिव रौंधळ यांस या जादा घेतलेल्या रक्कमेबाबत चौकशी केली होती; मात्र त्यांनाही सचिवाने उडवा उडवीची उत्तरे दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Red Alert : राज्यातील बावीस जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rohit Pawar : ‘’मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला...’’ ; रोहित पवारांनी साधला निशाणा!

Finance Ministry New Address: अर्थ मंत्रालयाला नवे घर मिळणार, नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडणार, 'या' भवनात नवा प्रवास सुरू करणार

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस धोक्याचे, पावसाचा जोर आणखी वाढणार; मान्सूनचा राज्यातील परतीचा प्रवास लांबला

IND vs SL Live: अभिषेक शर्माचा विक्रमांचा पाऊस! तिलक वर्मा, संजू सॅमसनची साथ; भारताच्या तगड्या धावा

SCROLL FOR NEXT