पुणे

बोरघरला आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी

CD

फुलवडे, ता. २४, बोरघर (ता.आंबेगाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी बोरघर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समिती आंबेगावचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सरपंच सीताबाई बांबळे यांनी दिली.
बोरघरच्या लोकसंख्येच्या निकषानुसार शासनाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याठिकाणी मंजूर असून त्याची इमारत व कर्मचारी स्टाफ भरलेला आहे. आदिवासी दुर्गम भागातील हे गाव पेसा क्षेत्रात येत असून १६ किलोमीटरच्या परिसरात दुर्गम डोंगराळ भागात १२ वाड्यावस्त्या आहेत. येथील अनेक वाड्यावस्त्यांवरील घरापर्यंत जाण्यासाठी अद्याप रस्ते नसल्याने रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणे अवघड होत आहे. त्याचप्रमाणे येथील उपकेंद्रात एकच कर्मचारी कार्यरत असल्याने अपुरी आरोग्य सुविधा मिळत आहे. त्याचप्रमाणे अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी पायपीट करूनही वेळेत आरोग्य सुविधा न मिळाल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे ग्रामसभेत ठराव घेऊन प्रशासनाकडे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना उपसरपंच दादू उंडे, सरपंच सीताबाई बांबळे, किसन खामकर, मीरा खामकर, अजित वालकोळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT