पुणे

जनजाती गौरव वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

CD

फुलवडे, ता. १२ : आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबरला १५० वा जन्मदिवस असल्याने केंद्र सरकारकडून २०२४-२०२५ हे ‘जनजाती गौरव वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले होते. या निमित्ताने जनजाती गौरव दिन उत्साहाने साजरा करण्याकरिता गुरुवार (ता. १८) पासून राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या राज्यातील ४९७ शासकीय, ५५४ अनुदानित आश्रमशाळा, १६२ नामांकित शाळा, ३७ एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच ४९० शासकीय वसतिगृहात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दिली.
राबविण्यात येणारे उपक्रम - आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख होण्याकरिता व्याख्यान, आदिवासी क्रांतिकारकांचा परिचय आणि त्यांचे कार्य याबाबत प्रदर्शन, आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनपथावर आधारित प्रश्नमंजूषा, दिंडी-प्रभात फेरी, पुस्तकांचे प्रदर्शन, विविध पथनाट्य, लघुचित्रपट, वर्तमानपत्रातून क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल लेख, आदिवासी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी महिला बचत गटांचे मेळावे, आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर वत्कृत्व, चित्रकला, रांगोळी, निबंध, गायन, बालनाट्य स्पर्धा, चित्र, विज्ञान प्रदर्शने, स्वरचित कविता, पोवाडे, सामुहिक नृत्यस्पर्धा या प्रकल्पस्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावर होतील. अंतिम स्पर्धा तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे.
जन्मोत्सवात रानभाजी महोत्सव, पौष्टिक धान्य महोत्सव, भरडधान्य, आदिवासी पाककलेचे दर्शन घडवणारे खाद्यपदार्थांचे, शबरी नॅचरल्स ब्रेड, इतर शेतकरी उत्पादक संघ, वनधन विकास केंद्रांच्या वस्तू व वनोपज यांचे प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था करण्यात येणार आहे.

उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान
आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा यथोचित सन्मान (आदिवासी सेवक पुरस्कार वितरण), दहावी-बारावी परिक्षांमध्ये विशेष गुणांसह प्रावीण्य मिळविलेले ‘राघोजी भांगरे गुणगौरव’ प्रोत्साहानपर बक्षीस पात्र अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेमार्फत निवड झालेले आदिवासी विद्यार्थी, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये निवड झालेले विद्यार्थी, परदेश शिष्यवृत्ती प्राप्त आदिवासी विद्यार्थी आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT