पुणे

डिंभे धरण १०० टक्के

CD

फुलवडे, ता. १९ : डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा पाणीसाठा शुक्रवारी (ता. १९) सकाळी सहा वाजता १०० टक्के म्हणजेच १२.५०० टीएमसी इतका झाला असून, आजअखेर १०२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा १०० टक्के इतका शिल्लक होता, तर १७३३ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता.
डिंभे धरणाच्या सांडव्यावरून घोड नदी पात्रात रात्री ११.३० वाजता पाच हजार, रात्री १.३० वाजत ७ हजार ७८० व सकाळी ७ वाजता ५ हजार, सकाळी ८ वाजता ४ हजार व सकाळी ८.४५ वाजता सांडव्यावरून ४ हजार व वीजघरातून ५५०, सकाळी ११ वाजता सांडव्यावरून २ हजार व वीजघरातून ५५० असा एकूण २ हजार ५५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील डिंभे, वडज, येडगाव, माणिकडोह व पिंपळगाव जोगा या प्रमुख पाच धरणांच्या कुकडी प्रकल्पाचा शुक्रवारी एकूण पाणीसाठा ८८.५९ टक्के म्हणजेच २६.२९१ टीएमसी इतका झाला आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ८६.०७ टक्के म्हणजेच २५.५४४ टीएमसी इतका होता.

कुकडी प्रकल्पातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.
धरणाचे नाव - टक्केवारी - (टीएमसी) - पडलेला पाऊस (मिलिमीटर)
डिंभे - १०० (१२.५००) १०२०
वडज - १०० (१.१७३) ५१४
येडगाव - १०० (१.९४३) ४३८
माणिकडोह - ६९.८९ (७.११४) ६२२
पिंपळगाव जोगे - ९१.४९ (३.५५९) ६०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajura Constituency: राहुल गांधींचा आरोप, पण 'राजुरा'मध्ये 'त्या' लोकांची नोंद झालीच नाही; निवडणूक आयोगाचा दावा

IND vs OMN : ओह shit..! शुभमन गिलचा ऑफ स्टम्प ओमानच्या गोलंदाजांने उखडून टाकला; संजू सॅमसनही गांगरला, Video

Mumbai News : अनिल अंबानी, राणा कपूर विरोधात सीबीआयचे आरोपपत्र सादर

Barshi Crime : अल्पवयीन मुलीला विवाहासाठी बंदुकीची धमकी; दोन मुलांसह आई-वडिलांवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates: कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT