फुलवडे, ता. २८, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
फुलवडे, बोरघर, वचपे, पंचाळे, अडिवरे, माळीण, असाणे, तिरपाड, कुशीरे, म्हाळुंगे, पाटण, पिंपरी, नानवडे, पिंपरगणे, डोण, न्हावेड, आहुपे आदी गावांमध्ये मागील दोन दिवसात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळल्याने भात पीक पूर्णपणे शेतात सपाट झाले आहे. भाताच्या ओंब्या पाण्यात भिजून वाहून गेल्या आहेत. निसर्गाच्या कोपामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने आमच्याकडे पहावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी असाणे येथील शेतकरी किसन मोरे, नावजी गभाले, पोपट शेळकंदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे ऋतुचक्राप्रमाणे पावसाचे महिने आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर महिन्यातही पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस अजूनही सुरूच आहे. त्यामुळे शेतातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बुधाजी डामसे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
04568
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.