अविनाश घोलप : सकाळ वृत्तसेवा
फुलवडे, ता. १८ : बोरघर (ता.आंबेगाव) येथे बोरघर, वरसावणे, फुलवडे, कोलतावडे या गावांमधील जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) सुरू आहे. दवाखान्यासाठी स्वतःची जागा व इमारत दोन्हीही नाही. जुन्या ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात दवाखाना सुरू आहे. ही इमारत पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे काम करणे जिकिरीचे ठरत असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
दवाखान्यात एकही पूर्ण वेळ अधिकारी/कर्मचारी मागील दोन वर्षांपासून उपलब्ध नाही. येथील अतिरिक्त कार्यभार पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. सुरेश कड यांच्याकडे आहे. डिंभे खुर्द व बोरघर या दोन्हींचा कारभार पाहावा लागत असल्याने कामाचा ताण वाढत आहे.
यांची आहे गरज
- रिक्त जागा भरणे
- दवाखान्यास स्वतःची जागा व इमारत
- निवासस्थानासह मनुष्य बळ
- स्वच्छतागृह
- अत्याधुनिक एक्स रे मशिन, सोनोग्राफीची सुविधा
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या......५२
वंध्यत्व निर्मूलन संख्या......१७
लसीकरण -
लाळ्या खुरकूत......३९०
लंपी......३९५
परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
स्तनदाह
प्रोटोझोअल डिसीजेस
चयापचय आजार
वैरण बियाणे वितरण
मका, ज्वारी- ९९ किलो
बोरघर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असणारी विविध प्रकारची औषधे उदा. जंतनाशके, मिनरल मिक्सचर, चाटण विटा इत्यादींचा लाभ घ्यावा. एफ-एम-डी, लंपी आदींचे लसीकरण वेळच्या वेळी करून घ्यावे.
- डॉ सुरेश कड, पशुधन विकास अधिकारी, बोरघर ता. आंबेगाव.
बोरघर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर नवीन जागेत दवाखाना सुरू होईल.
- विजय जंगले, सरपंच, ग्रामपंचायत बोरघर (ता. आंबेगाव).
04643