पुणे

माळशेज घाटात दरडी कोसळण्याचा धोका

CD

पिंपळवंडी, ता. ३० : माळशेज घाटात कोसळणाऱ्या धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्यासाठी घेण्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभरातून पर्यटक येतात. येथील हिरवेगार डोंगर, मनमोहक दऱ्या पाहून पर्यटक हरखून जातात. ठाणे व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला माळशेज घाट पावसाळ्यात काळात पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. मात्र, घाटात दरडी कोसळण्याचा धोका अधिक असतो. यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

माळशेज घाटाच्या बोगद्या पलीकडे अनेक पर्यटक वाहने थांबवून पावसात भिजण्याचा तसेच फोटो काढण्याचा आंनद घेत असतात. येथे दरड कोसळण्याची भीती असते. प्रशासनाने याबाबतच्या सूचना दिलेल्या असताना देखील पर्यटक येथे जास्त काळ थांबत असतात. रस्ता अरुंद असल्याने वाहनांची गर्दी होते. दरीच्या कडेला उभे राहून फोटो काढतात. यामुळे धोका अधिक असतो.

घाटात येथे तरकारी, फुले आदी माल वाहतूक करणारे वाहनचालक देखील त्यांचा कचरा हा तसाच रस्त्याच्या कडेला टाकून देत असतात.अनेकदा मेलेल्या अनेक कोंबड्या या रस्त्याच्या कडेला टाकल्याने माळशेज घाटातून प्रवास करताना अत्यंत दुर्गंधी येत असते. प्रशासनाने यावर वेळीच आवर घालणे गरजेचे बनले आहे.


या उपाययोजनांची आवश्‍यकता
१. पर्यटकांवर लक्ष देण्यासाठी कर्मचारी नाही
२. तळीराम, धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण नाही
३. पर्यटकांनी सूचना पाळणे गरजेचे
४. व्यावसायिकांनी कचऱ्याची विल्हेवाट लावावी

घाटात अशी घ्या काळजी
१. तीव्र वळणाच्या, निसरड्या रस्त्यावर वाहन काळजीपूर्वक चालवा
२. घाटात दाट धुके असल्याने वाहन सावकाश चालवा हळुवारपणे चालविणे.
३. वाहने योग्य ठिकाणी पार्क करावे, बेशिस्त पार्किंग टाळावे
४. दरडीखाली, कड्यांवर छायाचित्र काढणे टाळावे


2509, 02507

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''पापाची हंडी आधीच फोडलीये, आता BMC मध्ये विकासाची हंडी लागेल अन् लोणी…; फडणवीस काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप

अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी! भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात दिसणार अनोखी प्रेमकहाणी

फेक सॅलरी स्लीपवर नोकरी मिळाली, पण काम येईना; बॉस तरुणीने बँक स्टेटमेंट मागताच...; काय घडलं?

IPL 2026: CSK बॅकफूटवर, संजू सॅमसनसाठी आयपीएल विजेता संघ उतरला मैदानात; दोन स्फोटक खेळाडूंना RR ला देण्याची तयारी

SCROLL FOR NEXT