पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगार जखमी

CD

पिंपळवंडी, ता. ५ : काळवाडी (ता.जुन्नर) परिसरात ऊसतोड सुरू असताना बुधवारी (ता.४) दुपारी ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला केला व त्याला जखमी केले.
शांताराम दामू भील (मूळ रा. जामनेर, जि. जळगाव) हा ऊस तोडायचे काम करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याचा पंजा लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, शेजारील मजुरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शांतारामला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली येथील शेतकरी व नागरिक जीवन जगत असून, यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे. ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार व शेतमजूर यांनी शेतात काम करत असताना सतत जागरूक राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जीआर आला! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; आता 'अशी' चूक पुन्हा करु नका

"ते माझ्या पाठीवरून हात फिरवायचे.." मराठी अभिनेत्रीला सिनियर कलाकाराचा चुकीचा स्पर्श ; "मी मोठ्याने बोलले.."

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

Malaysia Job Portal: विदेशात नोकरीची सुवर्णसंधी! जॉब पोर्टल लाँच झाल्याने मलेशियात एजंटशिवाय मिळणार जॉब

Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT