पुणे

पिंपळवंडीतील शिवारात पाचवा बिबट्या जेरबंद

CD

पिंपळवंडी, ता. ५ : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील काकडपट्टा शिवारातील शेतकरी मयूर नेताजी वाघ यांच्या घराजवळील शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता.४) दुपारी बिबट्या जेरबंद झाला, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.
मयूर यांच्या घराजवळ वनविभागाने गेल्या तीन ते चार महिन्यात पकडलेला हा पाचवा बिबट्या आहे.
वाघ यांनी वनविभागाला घटनेची माहिती कळविल्यानंतर ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
या बिबट्याच्या गळ्याला रेडिओ कॉलर असून यापूर्वी देखील या बिबट्याला पकडले असल्याचे समजून आले आहे. वनविभागाच्या माध्यमातून पकडलेले बिबटे पुन्हा सोडत नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, बिबट्या पकडून त्याला रेडिओ कॉलर लावून, पुन्हा सोडून दिले जात असल्याचे या घटनेवरून निष्पन्न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेण्यात आले आहे. हा बिबट सहा ते सात वर्षांची मादी असल्याचे निवारा केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांनी काही महिन्यांपूर्वी दहा ते पंधरा बिबट्यांना रेडिओ कॉलर लावली होती. यामागे बिबट्याचा दैनंदिन जीवनक्रम व बिबट्यांच्या सवयींचा अभ्यास करण्यासाठी या रेडिओ कॉलर लावण्यात आल्या होत्या. या बिबट मादीला कधी रेडिओ कॉलर लावली आहे याची माहिती आम्ही भारतीय वन्यजीव संस्थेकडून मागवली आहे.
- स्मिता राजहंस, सहायक वनसंरक्षक, वनविभाग

बिबट्याच्या दहशतीमुळे आमचं सर्व कुटुंब भयभीत झालं आहे. शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. आज सकाळी देखील दोन बिबटे आम्हाला दिसले. वनविभागाने लावलेले ट्रॅप कॅमेरे देखील व्यवस्थितरीत्या काम करत नाहीत. वनविभागाचे कर्मचारी त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत.
- मयूर वाघ

02759

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: रत्नागिरीत निकालाआधी धडधड वाढली, सत्तेचं गणित कोणाच्या बाजूने झुकणार?

Zilla Parishad Elections Result : निकालाआधीच महायुतीने मारली बाजी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या २७ जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची यादी!

ZP election counting update : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल किती वाजता लागणार?, प्रशासनाची जय्यत तयारी

Sindhudurg ZP Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांचा कौल कुणाला? आज चित्र होणार स्पष्ट; सावंतवाडीत सर्वाधिक ६९.८४ टक्के मतदान

Satara ZP Election Results : राजकारणातला 'गब्बर' साताऱ्यात बाजी मारणार? बहुमतासाठी 33 जागांचं गणित; पहिला निकाल 11 पर्यंत लागणार!

SCROLL FOR NEXT