पारगाव मेमाणे, ता. २७ : पारगाव मेमाणे (ता.पुरंदर) येथील शेतकरी संपत मेमाणे यांनी अर्धा एकरमध्ये व १६२ डाळिंबाच्या झाडांपासून आठ लाख रुपये नफा मिळविला आहे. बारा वर्षे वयाच्या झाडांपासून यावर्षी साडेदहा टन डाळिंबाचे उत्पादन मिळवले.
माशी, काटा डंख, प्रतिकूल हवामानामुळे टनभर डाळिंब खराब झाले. साडे नऊ टन डाळिंबाची बांधावरच विक्री केली. सरासरी ११० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने दोन लाख खर्च वजा जाता आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. जिद्द अन् सळसळत्या उत्साहामुळे वयाच्या सत्तरीनंतरही अधिक उत्पादन घेणारे, तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून तंटे सोडविणारे मेमाणे ‘कृषी मार्गदर्शक’ही आहेत.
दृष्टिक्षेपातील उभारली बाग
१. आपल्या वातावरणात टिकणारा ‘भगवा’व्या वाणाची निवड
२. प्रत्येकी चार क्रेट फळं देणारी १६२ झाडे .
३. झाडांत पूर्व-पश्चिम १२ व उत्तर-दक्षिण १० फुटाचं अंतर ठेवले
४. मुबलक सेंद्रिय खते, निगराणीमुळे भरगच्च फळभार
५. पावसाळ्यातील नुकसान टाळण्यासाठी झाडाला १५ बांबूकाठ्यांचा आधार
नियोजनामुळे अधिक नुकसान टळले
दरवर्षी झाडांची वेळेत छाटणी करणे, संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण ,खांदणीबाबत तडजोड करत नाहीत. यावर्षी महिनाभर अगोदरच पावसाळा सुरू झाल्याने प्रादुर्भावामुळे,उत्पादन घटले. मात्र नियोजनामुळे कमी नुकसान झाले. सिंचनासाठी ठिबकचे सर्वकाळ नियोजन केले आहे.
खत व्यवस्थापन-
डिसेंबरअखेर कच्चे शेणखत विकत घेऊन
जंतुनाशक, बुरशीनाशकांच्या फवारणीसह कुजविले. जोडीला गोमूत्र व जीवामृतचा डोस बहार धरल्यावर, फळ सुपारीच्या आकाराचे झाल्यावर दिला. इतर प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाने अत्यल्प रासायनिक खतांचा वापर केल्याने फळे रसरशीत, टंचदार राहिली.
सकाळ व ॲग्रोवनचा वाचक आहेत. शेती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीचा उत्पादन घेताना उपयोग होतो. ‘सकाळ’मुळे इतरांनाही मार्गदर्शन करता येते. शेती विषयक बातम्या, लेख, मला नेहमीच प्रेरणा देत आहेत.
- संपत मेमाणे, डाळिंब उत्पादक
आनंद मिळविण्यासाठी शेतीत काम
‘गोदरेज’मधील निवृत्तीनंतर ठाण्यातील प्रशस्त बंगला सोडून जन्मगावी मातीत रमलो. अनुभव नसताना अर्थार्जनासाठी नव्हे केवळ आनंद मिळवण्यासाठी शेतीत काम करीत आहे. मात्र सगळे जमू लागले. पत्नीने परिपूर्ण साथ दिली मुलं, सुना उच्चशिक्षित, शहरात मोठ्या पगारांच्या नोकरीत आहेत. प्रत्यक्ष मदत शक्य नसली तरी प्रोत्साहन देऊन कामाचा खूप आदर करतात, असे संपत मेमाणे यांनी सांगितले.
00718
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.