पुणे, ता. १२ : जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणीचे अखेर निश्चित झाले आहे. ससून रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाकडून ही तपासणी केली जाईल, वेळापत्रकानुसार बदलीपात्र दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
अनेक दिवसांपासून कोणत्या रुग्णालयाने तपासणी करायची यावरून चर्चा सुरू होती. पहिल्यांदा ससून रुग्णालयाने तपासणी करण्यासाठी कामाचा ताण अधिक असल्याने असहमती दर्शवली होती. त्यानंतर मुंबईमधील रुग्णालयांकडून तपासणी करण्याचे ठरले. मात्र, तेही शक्य न झाल्याने आता पुन्हा ससून रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाकडून करण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची सध्या ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू आहे. परंतु, काही शिक्षकांनी सोईच्या बदलीसाठी विशेष संवर्ग एकमधून अर्ज करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडले असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून बदली प्रक्रियेतील दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांची फेरतपासणी करण्याचे निश्चित केलेले आहे. तपासणीला होत असलेला विलंब आणि इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून आंदोलनही करण्यात आले होते.
काहींनी बनावट प्रमाणपत्र बदलीसाठी वापरले?
जवळपास तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये ४९१ पेक्षा अधिक दिव्यांग शिक्षकांचा समावेश आहे. या प्रक्रियेअंतर्गत विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परितक्त्या, घटस्फोटित महिला शिक्षक, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने त्रस्त आहेत, अशा शिक्षकांचा संवर्ग एकमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काहींनी बनावट प्रमाणपत्र बदलीसाठी वापरण्यात असल्याचा संघटनांचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.