पुणे, ता. १९ : एस.पी.एम. इंग्लिश पब्लिक स्कूलच्या अनन्या पाटील व विधिता घाटकर, मिलेनियम नॅशनल स्कूलची ईक्षा कुळकर्णी आणि अल्फोन्सा हायस्कूलची कार्तिकी नढे यांनी पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्समध्ये आगेकूच कायम ठेवत १२ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
डेक्कन जिमखाना येथे बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील अटीतटीच्या उपांत्यपूर्व लढतीत अनन्याने एस.पी.एम. इंग्लिश पब्लिक स्कूलच्या स्पृहा गुजरचा ११-१३, १२-१०, ११-६, ११-१३, १३-११ ने, विधिताने अभिनव विद्यालयाच्या अस्मि तिखेचा ११-४, १४-१२, १२-२ ने, ईक्षाने वॉलनट स्कूलच्या पहेल कारियाचा ११-३, ११-१, ११-३ ने आणि कार्तिकीने डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या आर्या सरोदेचा ११-७, ११-२ ११-२ ने पराभव केला. मुलांमध्ये सिंबायोसिस स्कूलचा ओंकार अभ्यंकर व अभिनव विद्यालयाचा स्वानंद जोगळेकर यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठली. ओंकारने मिलेनियम नॅशनल स्कूलच्या अर्जुन दिवाणचा ११-८, ११-८ ने व स्वानंदने द कल्याणी स्कूलच्या आर्यन अय्यरचा ११-५, ११-८ ने पराभव केला.
अन्य निकाल
१२ वर्षांखालील एकेरी मुले : (दुसरी फेरी) : तनय इंगवले (माईर्स एमआयटी विश्वशांती, कोथरूड) वि. वि. लाव्य अग्रवाल (डॅफोडिल्स इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी) ११-२, ११-३, सिद्धार्थ निचारी (एलप्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड) वि. वि. प्रणित चौगुले (अमनोरा स्कूल, हडपसर) ११-३, ११-७, ईशान कोपलकर (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे) वि. वि. जिनय शाह (मेंटॉर इंटरनॅशनल स्कूल, हडपसर) ११-७, ११-९, वरदान पवार (भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिर) वि. वि. कुशाग्र त्रिवेदी (लोकसेवा इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाषाण) ११-३, ११-५, अंगद भार्गवे (एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल) वि. वि. शशांक शास्त्री (सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल) ११-६, ११-९, अथर्व शर्मा (विस्डम वर्ल्ड स्कूल, हडपसर) वि. वि. अयांश गुप्ता (ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, हडपसर) ११-२, १२-३, असित कुळकर्णी (एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल) वि. वि. लक्षित गांगल (सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे) ११-९, १२-८, आदित्य जैन (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर ) वि. वि. गोविंद पोफळे (सेंट मेरी) ११-४, ११-४, स्वानंद जोगळेकर (अभिनव विद्यालय, एरंडवणे) वि. वि. आर्यन अय्यर (द कल्याणी स्कूल, मांजरी) ११-५, ११-८, ओंकार अभ्यंकर (सिम्बॉयोसिस स्कूल, प्रभात रोड) वि. वि. अर्जून दिवाण (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर) ११-८, ११-८.
मुली (उपांत्यपूर्वफेरी) : सानवी नवनगुरू (एलप्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड) वि. वि. सहिती चोडावरापू (द कल्याणी स्कूल, मांजरी) ११-३, ११-३, आर्या सरोदे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे) वि. वि. अनिशा पवार (व्हर्सटाईल प्रायमरी स्कूल, वडगाव) ११-५, १२-७, अस्मि तिखे (अभिनव विद्यालय, एरंडवणे) वि. वि. शिवांजली भारद्वाज (एमआयएस इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी) १४-१२, १२-१०, विधिता घाटकर (एस.पी.एम. इंग्लिश पब्लिक स्कूल) वि. वि. खदिजा शेख (सेंट हेलेनाज स्कूल, कॅम्प पुणे) ११-०, ११-४, ईशा कुळकर्णी (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर) वि. वि. रक्षा गेले (जेएसपीएम)११-६, ११-९, पहेल कारिया (वॉलनट स्कूल, शिवाने) वि. वि. इसरा बापट (अभिनव विद्यालय, एरंडवणे) ११-४, ११-६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.