पुणे

स्कूलिंपिक्स क्रिकेट १६ वर्षांखालील मुले

CD

पुणे, ता. २१ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील मुलांमध्ये वाकडचे इंदिरा नॅशनल स्कूल, पिसोळी येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव-चाकण रस्ता येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल आणि फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल संघांनी शुक्रवारी (ता.२१) विजयी आगेकूच केली.
मुंढवामधील कोद्रे फार्म येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात इंदिरा नॅशनल स्कूलने गुलटेकडी येथील सेठ दगडूराम कटारिया हायस्कूलवर ४२ धावांनी विजय मिळविला. सामनावीर भव्य वदोदरीया याने अष्टपैलू खेळी करत झंझावती अर्धशतक झळकाविले. तसेच १ बळी टिपला. दुसऱ्या सामन्यात ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलने एनआयबीएम रस्ता येथील विबग्योर हायस्कूलवर ६ धावांनी निसटता विजय मिळविला. विजयी संघाच्या रेयांश मुंदडा याने २३ चेंडूंत अर्धशतक काढले. रेयांश यालाच सामनावीर किताब मिळाला. तिसऱ्या सामन्यात ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलने पुणे कॅम्प येथील हचिंग्ज स्कूल संघाला ५ गडी राखून पराभूत केले. कर्णधार अथर्व फुलसुंदर सामन्याचा मानकरी ठरला. अखेरच्या सामन्यात फुलगावच्या
नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलने सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेवर ८ गडी राखून मात केली. विजयी संघाच्या चैतन्य भोईर याने नाबाद ४० धावा केल्या. त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला.
कोथरूडचे बाल शिक्षण मंदिर, भिलारेवाडीतील आर्यन्स स्कूल आणि हडपसर येथील ग्रीनवूड्स स्कूल संघांनी गुरुवारी झालेल्या सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळविला. या सामन्यांमध्ये चिरंतन आराध्य, प्रिन्स खांडेकर आणि नील गायकवाड यांनी धडाकेबाज फलंदाजी करत सामनावीराचा बहुमान प्राप्त केला.

संक्षिप्त धावफलक ः
ज्ञानप्रबोधिनी ः १० षटकांत ४ बाद ८० (अर्जुन काळजे २९, मानस पोखरकर २-१९, साईराज भांबुरे १-१८) पराभूत वि. नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल ः १० षटकांत २ बाद ८१ (चैतन्य भोईर नाबाद ४०, आदेश चौरे २७, रुद्र सोनावणे २-१०).
हचिंग्ज स्कूल ः १० षटकांत ५ बाद ६५ (इंद्रजीत काळोखे १६, अथर्व फुलसुंदर २-४, जय वायकर १-१४, अर्जुन बुट्टे १-९) पराभूत वि. ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल ः ८.४ षटकांत ५ बाद ६६ (अथर्व फुलसुंदर १२, शुभ वाघ २-११, गौरांग गुप्ता १-२०, इंद्रजीत काळोखे १-१९, ओम वाघ १-२).

ट्रिनिटी इंटरनॅशनल ः १० षटकांत ३ बाद १२७ (रेयांश मुंदडा ५१, समर्थ सकपाळ ४७, परुष भागवत १-२०) वि.वि. विबग्योर ः १० षटकांत ४ बाद १२१ (विहान गिरधर ७१, स्वराज शिंदे १-१६, दीपक थोपटे १-१९, रेयांश मुंदडा १-२५, हर्षदीप साठे १-१५).

इंदिरा नॅशनल ः १० षटकांत ५ बाद १२४ (भव्य वडोदारिया नाबाद ५५, ओजस आळतेकर २३, आयुष जुजम २-१३, रोनित रांजणे १-१७, प्रसाद सूर्यवंशी १-३१) वि.वि. कटारिया हायस्कूल ः ९.४ षटकांत ९ बाद ८२ (प्रथमेश येळवंते २६, आयुष रोकडे १९, वेदांत गवळी ३-२१, तनुष पनदूर २-५, आयुष फडतरे ३-१२).

बाल शिक्षण मंदिर ः १० षटकांत २ बाद १४९ (चिरंजन आराध्ये ८८, क्षितीश कुलकर्णी २२, वेदांत घोलप १-२३, स्वयंम लोंढे १-२७) वि.वि. एमआयटी, लोणी काळभोर ः १० षटकांत ३ बाद ७१ (तक्ष जाधव १९, प्रनाद पांडे १९, अर्णव जानोरकर २-७).

आर्यन्स स्कूल ः १० षटकांत ३ बाद १४५ (प्रिन्स खांडेकर ७२, जेनिल पाद्या २४, रुद्र निलक १-२०) वि.वि. युनिक इंटरनॅशनल ः ८ षटकांत ६ बाद ४३ (रुद्र खांडवे १२, नील देशमुख २-४, जेनिल पाद्या १-०, आर्यन गद्रे १-२, ऋषभ शर्मा १-२).

ग्रीनवूड्स स्कूल ः १० षटकांत ४ बाद १४२ (नील गायकवाड ७६, पार्थ स्वामी ४२, वेदांत काळे १-१२, यतीन मांडवकर १-१६, ओम कांबळे १-३१) वि.वि. एमइएस बॉईज हायस्कू‍ल ः १० षटकांत ५ बाद ७१ (नैतिक सोनावणे १९, नील कौले २-५, ऋवेद मेहेर १-१४, नील गायकवाड १-१, भावेश चौधरी १-५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT