पुणे, ता. २२ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत स्टीफन कुमार याने हॅटट्रीकसह नोंदविलेल्या चार गोलांच्या जोरावर वाकड येथील इंफेन्ट जीसस स्कूलने चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलचा ४-० असा सहज पराभव केला. डीएसके, विबग्योर, लोकसेवा, जे.एन.पेटिट आणि केंब्रिज इंटरनॅशनल संघांनी आगेकूच चालू ठेवली.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. इंफेन्ट स्कूलच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरलेल्या स्टीफनने ३ ऱ्या, ८ व्या, १२ व्या आणि २४ व्या मिनिटाला गोल नोंदविले. स्पर्धेतील धायरी येथील डी. एस. के. स्कूलने बिबवेवाडी येथील पुष्पा इंटरनॅशनल स्कूलवर ५-० गोलने विजय मिळविला. विजयी संघाकडून आरव कन्नालने सर्वाधिक तीन आणि अनय जोशी व मंदार देशपांडे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
स्पर्धेतील अन्य सामन्यात येरवडा येथील विबग्योर हायस्कूलने वारजे येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलवर ३-१ गोलने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला. विजयी संघाकडून सुशांत शिवरमण, कैरव शर्मा व लक्ष्य सैनानी यांनी गोल नोंदविले. विवान चव्हाणच्या तीन गोलांच्या बळावर आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलने कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलला ४-० असे पराभूत करून आगेकूच कायम ठेवली.
याशिवाय फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलने कोथरूडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलला २-० असे पराभूत केले. दोन्ही गोल दिलात्सो नागाडंगने नोंदविले. अधिराज भिरंजेच्या दुहेरी गोलच्या बळावर जे. एन. पेटिट टेक्निकल हायस्कूलने हडपसरच्या विबग्योर हायस्कूल संघाला २-० असे तर चिंचवड येथील केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलने टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलला २-१ अशा गोल फरकाने मात दिली.
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलने बावधन येथील श्री चैतन्य स्कूलचा ३-० असा पराभव केला. आर्यन्सकडून आदित्य तारे, पार्शव दुगड व शिवांश पालने गोल नोंदविले. तर वेदस्व काकडेच्या दोन गोलांच्या आधारावर वडगाव येथील हेलिओस इंटरनॅशनल स्कूलने हडपसरच्या विस्डम वर्ल्ड स्कूलला २-१ असे पराभूत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.