पुणे

मावळचा मोडी वारसा : अभ्यासाची गरज

CD

मोडी वारसा भविष्यासाठी जतन करू या

- तनया गायकवाड (इतिहास विषय विद्यार्थिनी)

मोडी लिपी ही केवळ एक लेखनशैली नव्हती; तर ती मराठेशाहीच्या प्रशासनाची आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याची भाषा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंत राज्याचे सर्व कामकाज याच लिपीत चालत असे.
या आपल्या अमूल्य वारशाकडे दुदैवाने आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. हा ऐतिहासिक भक्कम वारसा उजेड्यात आपण आणू शकलो; तर मावळ तालुक्यातल्या अनेक ऐतिहासिक वर्षांची नव्याने उकल होऊ शकेल.
--------- सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, गड-किल्ल्यांचा मुकुट परिधान केलेला आणि पवना, इंद्रायणी आदी पवित्र नद्यांच्या पाण्याने सिंचित झालेला आपला मावळ तालुका. लोणावळा-खंडाळ्याची थंड हवा, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे संदर्भ सांगणारे लोहगड-विसापूर हे किल्ले, इसवी सनापूर्वी आणि इसवी सनानंतरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीचे केंद्र असलेल्या भाजे-कार्ल्याच्या प्राचीन लेण्या, असा हा सर्व दृश्य वारसा मावळवासीय अभिमानाने जपतात. आज महाराष्ट्रातूनच नाही; तर देशभरातून गिर्यारोहण, गिरीभ्रमंती, गड-किल्ले सर करणारी, जलाशयांच्या काठी छायाचित्रे टिपण्यासाठी तरुणाई मावळ तालुक्यात येते. या सगळ्या वारशाकडे अभिमानाने आणि अभ्यासाने पाहणारी आजची तरुण पिढी या दृश्य इतिहासाशी एकरूप झाली आहे असे मला वाटते. पण या दगड दऱ्यांच्या पलीकडे, कागदावर वळणावळणाच्या लिपीत दडलेल्या मावळ तालुक्याच्या खऱ्या इतिहासाचे काय? त्याकडे आजच्या पिढीचे दुर्दैवाने दुर्लक्ष होत आहे.

महाराष्ट्राचा ऐतिहासिक खजिना
मोडी लिपीची धावती, वळणावळणाची रचना जलद लेखनासाठी अत्यंत सोयीस्कर होती. या लिपीचे महत्त्व आपण खालील तक्त्यावरून समजू शकतो. त्या काळातील समाज कसा होता, अर्थव्यवस्था कशी होती आणि लोकांचे जीवनमान कसे होते, हे समजून घेण्याची किल्ली मोडी लिपीतील दस्तऐवजांमध्ये दडलेली आहे. मावळ तालुका हा स्वराज्याचे मर्मस्थान मानले जात असे. येथील गड-किल्ल्यांचा कारभार, वतनदारांचे हक्क आणि महसुलाच्या नोंदी याच मोडी लिपीत आहेत. विचार करा. लोहगडाच्या किल्लेदाराला महाराजांनी पाठवलेला संदेश, तळेगावच्या पाटलाने केलेला जमिनीचा व्यवहार किंवा पवना मावळच्या देशमुखांनी सोडवलेला तंटा, हे सर्व आज मोडी लिपीतील कागदपत्रांमध्ये बंदिस्त आहे.


दस्तऐवजाचा प्रकार महत्त्व
राजकीय आज्ञापत्रे महाराजांचे फर्मान, सरदारांना लिहिलेली पत्रे, तह आणि करार.
महसूल नोंदी गावाचा सारा, जमिनीची मोजणी आणि मालकी हक्काच्या नोंदी.
न्यायनिवाडे गावपातळीवरील तंट्यांचे निकाल आणि कायदेशीर कागदपत्रे.
रोजच्या नोंदी जमा-खर्च, देण्या-घेण्याची आणि हिशोबाची माहिती.
खासगी पत्रव्यवहार कौटुंबिक आणि वैयक्तिक पत्रव्यवहार.

प्रत्येकापर्यंत वारसा पोहोचवा
आजची परिस्थिती काय आहे? आजच्या तरुणाईला इन्स्टाग्रामवर ‘मावळ’ हॅशटॅग वापरून फोटो टाकायला आवडतात. पण, आपल्या पणजोबांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये दडलेला हा ऐतिहासिक वारसा त्यांना वाचता येत नाही. आपण गडावर जातो. पण, त्या गडाचा कारभार ज्या लिपीत लिहिला गेला, ती लिपी आपल्याला परकी वाटते. हा एक मोठा विरोधाभास आहे. हा वारसा केवळ काही इतिहास अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता तो मावळच्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचायला हवा.

अभ्यासाची गरज का?
मावळच्या मोडी वारशाचा अभ्यास करणे केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही; तर त्याचे सामाजिक आणि भविष्यातील महत्त्वही आहे. पुस्तकी इतिहासाच्या पलीकडे जाऊन आपल्या पूर्वजांचे
जीवन, त्यांच्या समस्या आणि तत्कालीन समाजव्यवस्थेचा खरा इतिहास थेट मूळ कागदपत्रांमधून समजून घेण्यासाठी मोडी लिपी शिकणे आवश्यक आहे.
‘आपला मावळ’ असे म्हणताना त्याच्या मुळाशी असलेला हा लिखित वारसा जपल्यास स्थानिक अस्मिता अधिक दृढ होईल. आपले गाव, घराण्याचा इतिहास उलगडण्याची संधी यातून मिळेल. ‘हेरिटेज वॉक’ सोबत ‘डॉक्युमेंटरी ट्रेल्स’ सारखे उपक्रम राबवून पर्यटकांना वारसा दाखवता येईल. इतिहास आणि भाषाशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी एक नवे दालन खुले होईल. मोडी कागदपत्रांचे संगणकीकरण आणि लिप्यंतर करून हा वारसा डिजिटल स्वरूपात जगासमोर मांडता येईल. आज आपण या लिपीकडे दुर्लक्ष केले; तर येत्या काही पिढ्यांमध्ये ही लिपी वाचू शकणारे लोक शिल्लक राहणार नाहीत आणि हा अमूल्य ठेवा कायमचा काळाच्या पडद्याआड जाईल.

काळाची गरज
मावळचा वारसा केवळ दगड-धोंड्यांमध्ये नाही; तर तो धुळीत पडलेल्या दस्तऐवजांमध्येही आहे. आजच्या पिंपरी चिंचवड आणि मावळच्या तरुण पिढीने पुढे येऊन हा वारसा स्वीकारण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये मोडी लिपी कार्यशाळा आयोजित करणे, स्थानिक इतिहास मंडळांनी पुढाकार घेणे आणि तरुणांनी कुतूहलाने हा विषय शिकून घेणे, ही काळाची गरज आहे. चला, आपल्या मावळच्या दृश्य वारशासोबतच या अदृश्य पण अमूल्य अशा मोडी वारशाचेही सच्चे ‘वारसदार’ बनू या आणि आपला गौरवशाली इतिहास भविष्यासाठी जतन करूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

मराठी बिग बॉस सुरु होणार? कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ, नेटकरी म्हणाले...'बिग बॉसचा ६ वा सिझन...'

Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

Nashik Election : भाजपचा बालेकिल्ला, तरी समस्या कायम! पंचवटी प्रभाग ७ मध्ये बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान

Pune Politics:'पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेबरोबर युती'; दौंडमध्ये भाजपची निवडणुकीच्या रिंगणातून माघार..

SCROLL FOR NEXT