पुणे

निखिल बोऱ्हाडे ः जनसंपर्कातून जनसेवेपर्यंतचा प्रवास

CD

निखिल बोऱ्हाडे प्रभाग क्र. २ की तीन खातरजमा करुन घेणे.


जनसंपर्कातून जनसेवेपर्यंतचा प्रवास

इंट्रो ः मोशी परिसरात निखिल बोऱ्हाडे यांचा प्रवास हा जनसंपर्कातून सुरू होऊन जनसेवेच्या वाटेवर स्थिरावलेला आहे. त्यांच्या कार्याची दिशा ही ‘कागदावरील आश्वासनांपेक्षा कृतीतून सेवा’ अशी आहे. मोशी प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांनी दाखविलेला विकास हेच त्यांचे जनसेवेचे ओळखपत्र ठरले आहे.‘जनतेचा आवाज हेच माझे बळ’ या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. आपल्या जनसंपर्काच्या बळावर नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
----------------------
जुन्या जमान्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील शेतकरी आजोबा स्व. परशुराम बोऱ्हाडे, चुलते माजी उपमहापौर शरद परशुराम बोऱ्हाडे अणि दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दोनमध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, भौतिक सुविधा आदींसाठी भरीव असे प्रेरणादायी कार्य निखिल शिवाजी बोऱ्हाडे यांचे सुरू आहे.
राजकारण हे केवळ सत्ता मिळविण्याचे साधन नसून लोकसेवेचे प्रभावी माध्यम असते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. साध्या पार्श्वभूमीवरून समाजसेवेची कास धरलेल्या या युवकाने आपल्या जनसंपर्काच्या बळावर नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जनतेचा आवाज हेच माझे बळ’, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे.

रस्ते विकासाची दिशा
मोशी परिसरातील लक्ष्मी चौक ते स्वराज रेसिडेन्सी व नाशिक महामार्ग ते रिव्हर रेसिडेन्सी या दोन प्रमुख रस्त्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. स्थानिक नागरिक, सोसायटी सदस्य आणि वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन निखिल बोऱ्हाडे यांनी हा विषय प्रशासनापर्यंत पोहोचविला. महानगरपालिका विकास आराखड्यातील या २४ मीटर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून अखेर काम सुरू करण्यात आले. त्याचा थेट लाभ प्रिस्टीन ग्रीन, सिल्वर नाईन, स्वदेशा, प्राईमल होम्स, स्वराज रेसिडेन्सी, मारिगोल्ड, क्रिस्टल सिटी, ऐश्वर्यम हमारा, रिव्हर रेसिडेन्सी या सर्व सोसायट्यांना झाला आहे. त्यांच्या या कामामुळे परिसरातील वाहतूक सुलभ झाली असून स्थानिक रहिवाशांच्या अडचणीही बऱ्याचअंशी दूर झाल्या आहेत.

आरोग्यसेवेचा संकल्प
निखिलदादा बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिराने प्रभागात आदर्श निर्माण केला. या शिबिरात ३ हजार ३४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ४ हजार रुग्णांना विनामूल्य औषधे, १ हजार नागरिकांना चष्म्यांचे वाटप, ५० तरुणांचा दोन लाख रुपयांचा विनामूल्य आरोग्य विमा काढण्यात आला. तसेच ३०० युवकांनी रक्तदान केले. याशिवाय फाउंडेशनच्या सहयोगामधून १२०० रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि ३ बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रियाही झाल्या. अशा व्यापक आरोग्य उपक्रमांनी समाजात आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असून गरीब व वंचित घटकांना वैद्यकीय मदतीचा हात मिळाला.

शिक्षणातील प्रगतीला चालना
स्थानिक तरुण पिढीमध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी निखिल बोऱ्हाडे यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला. १० वी व १२ वी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून शिक्षण हेच सामाजिक प्रगतीचे साधन आहे, हा संदेश त्यामधून दिला गेला आहे.


वाहतूक समस्येवर ठोस उपाय
चिखली-मोशी शिवरस्त्यावर वाढत्या रहदारीमुळे वाहतूक कोंडीची
समस्या गंभीर झाली होती. बोऱ्हाडे यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीला पाठबळ देत आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने या रस्त्याचे रुंदीकरण व पुनर्बांधणी केली. त्याने वुड्सविले फेज-१, कुमार प्रिन्सविले, स्वराज सोसायटी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या प्रयत्नामुळे वाहतूक व्यवस्थापन सुधारले असून अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.


नागरिकांच्या गरजा पूर्ण
वाघेश्वर कॉलनीतील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. बोऱ्हाडे यांनी हा मुद्दा आमदार महेशदादा लांडगे यांच्यापर्यंत पोहोचवून त्याचे काम तत्काळ सुरू करविले. महापालिकेचे अधिकारी नरेश जाधव आणि कलाल साहेब यांच्या उपस्थितीत पाहणीही करण्यात आली. या विकासामुळे स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या असून परिसराचे सौंदर्यही वाढले आहे.


विद्युत समस्यांचे निराकरण
योगिराज कॉलनीतील अंतर्गत विद्युत केबल नसल्यामुळे वारंवार वीजपुरवठ्याबाबत तक्रारी येत होत्या. स्थानिक रहिवाशांची ही अडचण लक्षात घेऊन बोऱ्हाडे यांनी हा विषय आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे मांडला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्याने अंतर्गत वीज पुरवठा सुरू झाला. या कृतीमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास वाढला आणि बोऱ्हाडे यांच्या जनसंपर्काची परिणामकारकता दिसून आली.

ई-बसला मंजुरी
मोशी परिसरात पर्यावरणपूरक व आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी, या मागणीसाठी बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तम दर्जाच्या ई-बस सुरू करण्याची विनंती केली होती. राज्य शासनाने ही मागणी मान्य करून बससेवा सुरू केली. या निर्णयामुळे मोशी परिसरातील नागरिकांना प्रदूषणमुक्त व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळाली.

स्मशानभूमीसाठी पाठपुरावा
मोशी परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त आणि उत्तम दर्जाच्या स्मशानभूमीची आवश्यकता जाणवत होती. बोऱ्हाडे यांनी या विषयावर महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्याचा प्रस्ताव मान्य होऊन कामकाजाला सुरुवात झाली आहे. या प्रयत्नामुळे परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असून सामाजिक गरजा सोडविण्यात बोऱ्हाडे यांना यश आले आहे.

महावितरण कार्यालय कार्यरत
मोशी परिसरातील वारंवार खंडित वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते. बोऱ्हाडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्वतंत्र शाखा कार्यालय स्थापन करण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नामुळे मोशी महावितरण शाखा कार्यालय सुरू होण्यास मंजुरी मिळाली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित सेवा मिळणार असून वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या सोडविण्याचा मार्ग खुला झाला आहे.


विकास हेच ओळखपत्र
जुन्या जमान्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील शेतकरी आजोबा स्व. परशुराम बोऱ्हाडे, चुलते माजी उपमहापौर शरद परशुराम बोऱ्हाडे यांच्या सामाजिक कार्यापासून निखिल बोऱ्हाडे यांनी प्रेरणा घेतली. त्यामधून पुढे त्यांनी जनसंपर्क साधण्यास सुरुवात केली. त्याचा हा प्रवास आता जनसेवेच्या वाटेवर स्थिरावलेला आहे. त्यांच्या कार्याची दिशा ही ‘कागदावरील आश्वासनांपेक्षा कृतीतून सेवा’ अशी राहिली आहे. त्यामधून त्यांनी मोशी प्रभाग क्रमांक ३ मध्ये विकासाला आश्वासक दिशा दिली आहे. त्यांनी प्रभागात केलेला विकास हेच त्यांच्या जनसेवेचे जणू ओळखपत्र ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT