पुणे, ता.२५ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये गुलटेकडी येथील ह्युम मॅकेनरी मेमोरियल हायस्कूल, बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल, फुलगावचे लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि वाघोलीच्या न्यू टाईम्स स्कूल या संघांनी मंगळवारी (ता.२५) विजय मिळविले.
पहिल्या सामन्यात ‘ह्युम मॅकेनरी मेमोरियल’ने एमईएस विमलाबाई गरवारे प्रशालेवर ३९ धावांनी विजय मिळविला. सामनावीर ईशान माळी याने ३६ चेंडूंत नाबाद ६० धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात सीएम इंटरनॅशनल स्कूलने प्रभात रस्ता येथील सिंबायोसिस स्कूल संघावर ९ गडी राखून मात केली. शिवराम सरोदे सामन्याचा मानकरी ठरला. त्याने २६ चेंडूंत नाबाद ४१ धावा केल्या. शिवराम याला सामनावीराचा बहुमान मिळाला. तिसऱ्या सामन्यात लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलने हांडेवाडीच्या एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल संघावर ९ गडी राखून विजय मिळविला. साहिल भादलकर याला सामनावीराचा किताब मिळाला. शेवटच्या सामन्यात न्यू टाईम्स स्कूलने वडगाव शेरीच्या सेंट अरनॉल्ड स्कूलचा ९ गडी राखून पराभव केला. वेदांत शेळके सामनावीर ठरला. त्याने २८ चेंडूंत नाबाद ४४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
ह्यूम मॅकेनरी मेमोरियल : १० षटकांत ३ बाद १०५ (ईशान मायी नाबाद ६०, अनिश डबले १०, आयुष दिवकर १-१५) वि. वि. एमईएस विमलाबाई गरवारे : १० षटकांत ७ बाद ६६ (शंकर सागरे १५, आयुष दिवकर ८, धैव्य शाह १-३, अनिश डबले १-१२, सिद्धेश मंडलेकर १-२).
सिंबायोसिस, प्रभात रस्ता : १० षटकांत ५ बाद ६९ (अथर्व आंबिटकर १४, यश कोलठकर ११, शौर्य जगताप १-९, कांदर्प पारिक १-११) पराभूत वि. सी. एम. इंटरनॅशनल : ७.५ षटकांत १ बाद ७२ (शिवराज सरोदे नाबाद ४१, आर्यन खुराडे १/१२).
एसएनबीपी इंटरनॅशनल : १० षटकांत ४ बाद ५० (रिशान नाईक २२, अर्जुन राठोड २-४, ऋग्वेद मंडलिक १-१०) पराभूत वि. लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल : ४.४ षटकांत १ बाद ५१ (श्रीशैल्यम इंगळे नाबाद २०, साहिल भादलकर नाबाद ११, सक्षम पटेल १-४).
सेंट अर्नोल्ड : १० षटकांत ४ बाद ८० (शाश्वत देशमुख १८, अर्णव कदम नाबाद १०, आदर्श पांडे १-१४, श्लोक सिंग १-१४, प्रणव कटके १-९) पराभूत वि. न्यू टाइम्स : ८.५ षटकांत १ बाद ८१ (वेदांत शेळके नाबाद ४४, स्वराज जाधव १-१३).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.