पुणे, ता. २८ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात मांजरी येथील कल्याणी स्कूल आणि कोंढवा येथील सिंहगड सिटी स्कूलने त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांवर शुक्रवारी (ता.२८) मात केली.
सासवड-बोपोडी रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात कल्याणी स्कूलने उंड्री येथील नारायणी टेक्नो स्कूलचा तब्बल १३४ धावांनी पराभव केला. आदिश सिन्हा ४९ धावांच्या खेळीसाठी सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात कोंढवा येथील सिंहगड सिटी स्कूलने हडपसर येथील बिल्लाबोंगा हाय इंटरनॅशनल स्कूलचा ५७ धावांनी पराभव केला. सिंहगड सिटीचा निहाल फरांदे सामनावीर ठरला. अन्य सामन्यात लोणीकंदच्या न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलने लोणी काळभोर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलचा सात धावांनी पराभव केला. सिंहगड सिटी स्कूलने एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलचा ४१ धावांनी, तर कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलने तळेगावच्या हॅचिंग्स स्कूलवर ८० धावांनी मात केली.
----------------
संक्षिप्त धावफलक
कल्याणी स्कूल ः १० षटकांत १ बाद १५७ (आदिश सिन्हा नाबाद ४९, राजवीर टकले ४३) वि.वि. नारायणी स्कूल ः ७.४ षटकांत सर्वबाद २३ (सिद्धार्थ जांगिड ६, नेयांश राय ३-१०, पृथ्वीराज चौधरी २-०, देव शहा २-०) सामन्याचा मानकरी ः आदिश सिन्हा.
सिंहगड स्कूल ः १० षटकांत १ बाद १०० (निहाल फरांदे नाबाद ४१, अंशियाल चायपडे नाबाद ३२) वि.वि. बिल्लाबोंग ः १० षटकांत ७ बाद ४२ (युग सचदे १२, श्री काटके २-५, भार्गव जामदार २-७) सामन्याचा मानकरी ः निहाल फरांदे.
एमआयटी व्हीजीएस ः १० षटकांत २ बाद ७५ (अतिश टोबरे नाबाद ३७, तेजस बन्ने १-१८) पराभूत विरुद्ध न्यू टाइम्स इंटरनॅशनल ः ८.३ षटकांत ३ बाद ७६ (राज गडे नाबाद २३, अतिश टोबरे १-५).
सिंहगड सिटी ः १० षटकांत ३ बाद १०४ (भार्गव जामदार ४१, रेयांश चौधरी १-१५) वि.वि. डॉ. केएचएस ः १० षटकांत ८ बाद ६३ (संचित ढवळे २३, अंशुल चिपडे २-०, जिनेश डांगी २-१३, श्री काटके २-१५). सामन्याचा मानकरी ः भार्गव जामदार.
मिलेनियम नॅशनल ः १० षटकांत १ बाद १२८ (अरिन सातपुते नाबाद ६५, ओजस नवारे ४२, पवन गवळी १-२२) वि.वि. हचिंग्स ः १० षटकांत ८ बाद ४८ (स्वराज लिंबोरे ९, अर्घ्य मानरीकर २-१, अबीर पाठक २-३) सामन्याचा मानकरी ः अरिन सातपुते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.