अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० ः पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दरवाढ केल्याने दैनंदिन पास घेणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ३२ टक्के घट झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात खिशाला आणखी झळ बसत असल्याने अनेकांनी पीएमपीएमएलकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.
एक जूनपासून पीएमपीएमएलने तिकीट दर वाढविले. त्यामुळे अनेक प्रवाशांचा दैनंदिन आणि मासिक खर्च वाढला. त्यामुळे दैनंदिन पास विक्रीत कमालीची घट झाली. दरवाढीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यांतील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. दुसरीकडे विद्यार्थी मासिक पास घेणाऱ्यांची संख्या ५६ हजारांनी वाढली आहे. पीएमआरडीए हद्दीतील १५० रुपयांच्या पास विक्रीत किरकोळ वाढ झाली आहे.
दुसरीकडे पीएमपीएमएलच्या उत्पन्नात मात्र दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रांतील स्वतंत्र ४० रुपयांचा, तसेच दोन्ही महापालिका क्षेत्रांसाठी ५० रुपयांचा पास रद्द करण्यात आला. आता ७० रुपयांचा एकच पास ठेवण्यात आला. पीएमआरडीए हद्दीतील पास १२० रुपयांवरून १५० रुपयांचा करण्यात आला.
अशी झाली दरवाढ
पीएमपीएमएलचे आधी एक ते ७८ किलोमीटरकरीता प्रत्येकी दोन किमीच्या अंतराने १ ते ४० असे टप्पे होते. या रचनेत बदल करण्यात आला. एक ते ३० किमी अंतरासाठी प्रत्येकी पाच किमीच्या अंतराने सहा आणि ३० ते ८० किमी अंतरासाठी प्रत्येकी दहा किमीच्या अंतराने पाच अशी एकूण ११ टप्प्यांमध्ये रचना करण्यात आली. पहिल्या पाच किमीसाठी १० रुपये आणि ३० किमीपर्यंत प्रत्येक ५ किमीसाठी दहा रुपये वाढ करण्यात आली. ३० किमीपासून ८० किमीपर्यंत प्रत्येक दहा किमीसाठी दहा रुपये वाढ करण्यात आली.
---------
काय आहेत कारणे
- दोन्ही महापालिकांसाठी असलेले स्वतंत्र दैनंदिन पास बंद
- दैनंदिन पासच्या किमतीत वाढ
- पहिल्या टप्याचे रिक्षा आणि बसचे भाडे समान
------------
आकडे बोलतात
२०२४ / २०२५
महिना - ४० - ५० - १२० / ७० - १५०
जून - ११,३९,५६३ - ८,०५,९२६ - ४०,४१० / १३,५८,४६७ - ५१,८६६
जूलै - १२,२९,११३ - ७,९५,६७३ - ३२,६७९ / १५,३७,१०८ - ५८,१२३
ऑगस्ट - १२,९१,५५२ - ८,०६,८४८ - ३४,३५१ / १४,६०,९६२ - ५७,९३३
सप्टेंबर - १२,५७,४१७ - ७,९०,३९४ - ३३,७७२ / १३,८५,६२८ - ४८,७८९
ऑक्टोबर - १२,९२,५४८ - ७,५२,१७९ - ३१,६१० / १२,४४,३६७ - ५०,२९१
नोव्हेंबर - १०,५९,६०० - ६,६९,२१२ - ३४,६६८ / ९,३२,१०६ - ४९,२९३
------
एकूण ७२ लाख ६९ हजार ७९६ - ४६ लाख २० हजार २३२ - २ लाख ७ हजार ४९० / ७९ लाख १८ हजार ६३८ - ३ लाख १६ हजार २९५
---
पासधारक
२०२४ ः एक कोटी २० लाख ९४ हजार ५१८
२०२५ ः ८२ लाख ३४ हजार ९३३
घट ः ३८ लाख ५९ हजार ५८५
(कालावधी जून ते नोव्हेंबर)
---
उत्पन्न
पास - २०२४
४० - २९,०७,९१,७२०
५० - २३,१०,११,६००
१२० - २,४८,९८,८००
एकूण ५४ कोटी ६७ लाख २ हजार १२०
--------
पास - २०२५
७० - ५५,४३,०४,६६०
१५० - ४,७४,४४,२५०
एकूण - ६० कोटी १७ लाख ४८ हजार ९१०
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.