पुणे, ता २ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटाचा अंतिम सामना बुधवारी (ता. ३) रंगणार आहे. भूगाव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, वाकडचे इंदिरा नॅशनल स्कूल, कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूल आणि कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूल यांच्यामध्ये उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.
सासवड-बोपदेव रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर हे सामने सुरू आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंदिरा नॅशनल स्कूलने न्यू नऱ्हे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलचा सात विकेटने पराभव केला. अष्टपैलू खेळीसाठी अमेय चपळगावकर हा सामनावीर ठरला. अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत सिंहगड सिटी स्कूलने बाणेर येथील सी.एम इंटरनॅशनल स्कूलचा २३ धावांनी पराभव केला. २१ चेंडूत ३२ धावा आणि तीन विकेट, अशा अष्टपैलू खेळीसाठी अंशुल चिपाडे याने सामनावीराचा बहुमान मिळविला. तर उपांत्यपूर्व फेरीच्या शेवटच्या सामन्यात मिलेनियम नॅशनल स्कूलने बंडगार्डन येथील जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूलवर सात गडी राखून सहज मात करत उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. अष्टपैलू खेळीसाठी अरीन सातपुते हा सामनावीर ठरला. स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामन्यासह विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंदिरा नॅशनल : १० षटकांत ७ बाद ८९ (अमेय चपळगावकर ३२, शर्विल लाळे २७, आविष्कार पलंगे २-९, ओम गायकवाड २-१६, समर्थ जांभळे १-१०) वि.वि. ब्लॉसम पब्लिक : १० षटकांत ५ बाद ८२ (कौस्तुभ जांभळे ३३, ओम गायकवाड २३, शर्विल लाळे २-३, अंशुमन वाघ १-८, अमेय चपळगावकर १-१६, विहानसिंह राजपूत १-१८).
सिंहगड सिटी : १० षटकांत ३ बाद ८९ (अंशुल चिपाडे नाबाद ३२, भार्गव जामदार ३०, शौर्य जगताप १-८, सहर्ष नायक १-११) वि.वि. सी. एम. इंटरनॅशनल : १० षटकांत ७ बाद ६६ (शौर्य जगताप १८, शिवराज सरोदे १५, श्री कटके ३-४, अंशुल चिपाडे ३-१८, श्रीराम दुरकर १-१२).
जे.एन.पेटिट ः १० षटकांत ६ बाद ६७ (दक्ष पवार ३०, ध्रुव जाधव ८, श्रीश उपारे २-९, अरीन सातपुते १-१३, अबीर पाठक १-१७) पराभूत विरुद्ध मिलेनियम नॅशनल ः ९.१ षटकांत ३ बाद ६९ (समर्थ पोकळे नाबाद २२, अर्घ्य मणेरीकर नाबाद १०, ध्रुव जाधव १-१२, अतुल्य कारखिले १-१४).
आज होणार सामने
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर विरुद्ध इंदिरा नॅशनल स्कूल आणि मिलेनियम नॅशनल स्कूल विरुद्ध सिंहगड सिटी स्कूल या उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात लढणार आहेत. अंतिम सामन्यानंतर दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभूत संघ तिसऱ्या क्रमांकासाठी खेळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.