पुणे, ता.१२ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे प्रकारात
सम्राट कदम (१४.१), माही रासकर (१४.८) यांनी अजिंक्यपद पटकाविले. २०० मीटर धावण्यात ऋतुपर्ण शिंदे, अनामित्रो डे, द्रुमिल धांडे, अनुषा फडतरे, आर्या सायकर यांनी तर १५०० मीटर धावण्यात सिद्धी क्षीरसागर, आदित्य तोंडे यांनी बाजी मारली.
सारसबाग येथील सणस मैदानावर ही स्पर्धा झाली.
निकाल
१५०० मी. धावणे ः १४ ते १६ वर्षे मुली - सिद्धी क्षीरसागर (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी), समीक्षा ठोंबरे (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), गायत्री निगडे (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव). मुले - आदित्य तोंडे (एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड), अथर्व पेटकर (डॉ. कलमाडी शामराव, बाणेर), आगांसो क्री (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव). २०० मी. धावणे ः ८ ते १० वर्षे मुले - ऋतुपर्ण शिंदे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे),
शौर्य कदम (ट्रिनिटी इंटरनॅशनल, कोंढवा). १२ ते १४ वर्षे मुले - अनामित्रो डे (विद्याशिल्प पब्लिक, कोंढवा),
आदित्य माने (डीईएस, टिळक रस्ता), श्लोक व्यास (बिशप्स इंटरनॅशनल, कॅम्प). १४ ते १६ वर्षे मुले -
द्रुमिल धांडे (ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ), अवधूत देशमुख (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे),
कार्तिक पावसकर (सीईएस विलू पूनावाला इंग्लिश मीडियम, कॅम्प). १२ ते १४ वर्षे मुली - अनुषा फडतरे (अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे), कादंबरी शेलार (कटारिया, मुकुंदनगर), साक्षी हुंडलेकर (एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम, कोथरूड). १४ ते १६ वर्षे मुली - आर्या सायकर (विबग्योर इंग्लिश मीडियम, चिंचवड), राजनंदिनी मोहिते (सिंबायोसिस इंटरनॅशनल, प्रभात रस्ता), आर्या धामणे (सरहद, कात्रज).
१०० मी. धावणे ः १० ते १२ वर्षे मुले - सम्राट कदम (सरहद, कात्रज), अझलान सय्यद (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प),
ज्ञानेश अधवडे (महाराष्ट्रीय मंडळ श्रीमती इंदिराबाई करंदीकर स्कूल, टिळक रस्ता). मुली - माही रासकर (आर्मी पब्लिक ज्युनिअर विंग, रेस कोर्स), स्वरा चव्हाण (ब्लॉसम पब्लिक, ताथवडे), अद्वैता देशमुख (एमआयएस इंटरनॅशनल, बालेवाडी).
थाळीफेक ः १४ ते १६ वर्षे मुले - आदित्य काळभोर (डीईएस, टिळक रस्ता),
सोमेश गव्हाणे (सुदर्शन विद्या मंदिर, पिरंगुट), निश्चय सिंग (नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी, फुलगाव). मुली -
चैत्रगौरी साळवी (डीईएस न्यू इंग्लिश मीडियम, शनिवार पेठ), जयनी पाटील (माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, वानवडी),
स्वरांगी टण्णू (महावीर इंग्लिश मीडियम, मार्केटयार्ड). उंचउडी ः १२ ते १४ वर्षे मुले -
वापा वालीम (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), आर्य मतकर (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी), जियांश मित्तल (कल्याणी, मांजरी). १२ ते १४ वर्षे मुली - वीरा लोंबर (एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम, सदाशिव पेठ),
बतुल रेतीवाला (संस्कृती, उंड्री), विहाना शहा (इंडस इंटरनॅशनल, भुकूम). १४ ते १६ वर्षे मुली - कार्तिकी डोके (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे), विधी लाडे (द कल्याणी, मांजरी), मुले - आलोंग वालीम (लोकसेवा इंग्लिश मीडियम, फुलगाव), तन्मय वाघ (कटारिया, मुकुंदनगर), नागमन (लोकसेवा इंग्लिश मीडियम, पाषाण).
तिहेरी उडी ः १४ ते १६ वर्षे मुली - कार्तिकी रोकडे, मृण्मयी खोमणे (दोघीही डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे).
मुले - सुकृत जोशी (एमईएस बालशिक्षण मंदिर, कोथरूड), स्वराज बिछडू (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव),
ज्ञानसाई देशमुख (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी). १०० मी.हर्डल्स ः १४ ते १६ वर्षे मुले - वरद निकम (प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम, धनकवडी), प्रयाग गिरीश (विस्डम वर्ल्ड, वाकड), पार्थ लांडे (ध्रुव ग्लोबल, मुळशी). मुली -
मृण्मयी खोमणे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, बाणेर), अंकिता लगड (परांजपे विद्या मंदिर, कोथरूड), मानसी चव्हाण - जी.जी. इंटरनॅशनल, पिंपरी).