दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा
जिल्ह्यातील शिव शंकराचे जागृत देवस्थानापैकी एक श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान ओळखले जाते. गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन शिवमय होण्यासह शिल्पकला व शिल्प सौंदर्याचा अप्रतिम नमुना डोळ्यात साठवण्यासाठी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भुलेश्वरी येतात.
श्रावणासह वर्षभर मंदिरातील शिल्प सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी शिवभक्तांसह पर्यटनप्रेमी वर्षाविहार तसेच श्रावण महिन्यात मंदिरात दर्शनासाठी येतात. पुरंदर तालुका प्रशासन व माळशिरस ग्रामपंचायत, यवत व जेजुरी पोलिस स्टेशनच्या सहयोगातून यात्रेचे नियोजन केले जाते.
हे आवर्तन पहा
१. मंदिरात कोरीव कामात रामायण, महाभारतातील विविध प्रसंग
२. नाथ संप्रदायाशी निगडित अनेक शिल्प, समुद्रमंथन, भैरव, महिषासुरमर्दिनी
३. मंदिरामध्ये विविध प्रसंगांचे अंकन करून मंदिराचे स्थापत्य सौंदर्य
४. दर्शनी भागात स्त्री वेशातील विनायकाचे रूप
४. श्रावणात नित्यनेमाने अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येथे येतात.
*यात्रा नियोजन व सोयी
१. वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पायथ्यालगतच वाहनव्यवस्था
२. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा
३. गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिराभोवती दर्शनरांगांचे नियोजन
४. पोलिसांतर्फे रांत्रदिवस सुरक्षितेसाठी कर्मचारी तैनात
५. भाविकांना अभिषेक, पूजेच्या साहित्य उपलब्ध
शिवलिंग व गाभारा वैशिष्ट्ये-
१. सूर्योदयानंतर सूर्याची प्रथम किरणे थेट मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून शिवलिंगावर पडतात.
२. गाभाऱ्यात शिवलिंग खाली पहाटे दूध, केळी,पेढ्याचा नैवेद्य ठेवल्यानंतर तो आजही प्राशन केला जातो.
कसे जाल?
पुण्यापासून भुलेश्वर मंदिर हे अंतर ५५ किलोमीटर आहे. पुणे सोलापूर हायवे मार्गे यवत येथून भुलेश्वर घाट मार्गे येण्यासाठी एक रस्ता आहे. दुसरा रस्ता पुण्यातून दिवे घाट किंवा बोपदेव घाट मार्गे सासवड येथून भुलेश्वर येथे जाता येते.
मंदिराशेजारील पर्यटनस्थळे
१. भुलेश्वर घाटातील निसर्गसौंदर्य
२. मंदिरापासून ९ किलोमीटरवर यादवकालीन पांडेश्वर मंदिर
३. आंबळे येथे ढवळेश्वर हे शिवशंकराचे दुसरे मंदिर
भाविकांनी घ्यावयाची काळजी-
१. मंदिर परिसरात चोरांपासून सावध राहणे गरजेचे
२. घाट परिसरात धोकादायक ठिकाणी जाऊ नये.
३. वनविभागात वन्यजीवांच्या पासून दूर राहावे.
शिवभक्तांना आवश्यकता सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन व देवस्थान ट्रस्ट प्रयत्न करत असून दर्शन बारीसह आरोग्य, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांनी शिस्तीत दर्शनाचाावा लाभ घ्यावा.
- अरुण यादव, अध्यक्ष, भुलेश्वर देवस्थान ट्रस्ट
श्रावण महिन्यात होणारी गर्दी विचारात घेऊन भुलेश्वरी प्रत्येक सोमवारी आवश्यक तेवढ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दी व वाहतूक नियंत्रणासाठी चोख वाहन व्यवस्था केली. यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सीसीटीव्हीद्वारे कॅमेरे लावले आहेत.
- दीपक वाकचौरे , सहाय्यक पोलिस निरीक्षक, जेजुरी पोलिस ठाणे
मदतीसाठी संपर्क :
जेजुरी पोलिस ठाणे : ०२११५-२५३१२९
रुग्णवाहिका -१०८ क्रमांक
02509
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.