पुणे

भाविकांचे श्रद्धास्थान श्रीसंगमेश्‍वर मंदिर

CD

हनुमंत पवार
पुणे : पुरंदरमधील अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक, भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटकांचे आकर्षण असणारे श्रीसंगमेश्‍वर मंदिर हे कऱ्हामाई व भोगावती नद्यांच्या संगमावर उभे आहे. ते दोन नद्यांच्या संगमावर असल्याने त्यास ‘संगमेश्‍वर’ असे नाव मिळाले, असा प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे. सासवडमधील हे मंदिर पुराणप्रसिद्ध जागृत देवस्थान असून, प्राचीन स्थापत्य कलेचा आदर्श नमुना होय. येथील वातावरण आल्हाददायक व प्रसन्न असल्याने पर्यटकांची येथे कायम वर्दळ राहते. विशेषतः श्रावण महिन्यात या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. येथील धार्मिक, पौराणिक महत्त्वामुळे येथे अनेक मालिका, चित्रपटांचे चित्रण झाले आहे. पाच पांडवांनी एका रात्रीत या मंदिरासह कऱ्हाकाठावरील अनेक शिवमंदिरे बांधल्याची आख्यायिका आहे. श्रावणात श्रीसंगमेश्‍वर देवस्थान ट्रस्ट व सासवड नगरपालिकेच्या वतीने येथे विशेष सुविधा पुरविण्यात येतात.

इतर वेळेपेक्षा श्रावण महिन्यात भाविक व पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगमेश्‍वर मंदिरासह परिसरातील सर्व शिवमंदिरांत पोलिस व होमगार्ड बंदोबस्त ठेवला जातो. संगमेश्‍वर देवस्थान व पालिकेबरोबरीने आमच्याकडूनही भाविकांना सुरक्षा पुरवली जाते.
ऋषिकेश अधिकारी, पोलिस निरीक्षक, सासवड

मंदिर परिसरातील पर्यटन स्थळे -
१) संत सोपानकाका मंदिर
२) चांगावटेश्‍वर मंदिर
३) भैरवनाथ मंदिर
४) हरिहरेश्‍वर मंदिर
५) पुरंदर किल्ला
६) सोनोरीचा मल्हारगड
७) जेजुरीचे खंडोबा मंदिर
८) माळशिरसचे भुलेश्‍वर मंदिर
९) केतकावळेचे बालाजी मंदिर
१०) नारायणपूरचे एकमुखी दत्त मंदिर
११) वीर व कोडीतचे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर

मंदिरातील सुविधा -
१) पहाटे पूजाअर्चा
२) वाहन व्यवस्था
३) भाविकभक्तांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था
४) श्रावणात सुरक्षा व्यवस्था
५) मंदिराला आकर्षक रंगरंगोटी
६) डागडुजीसह छोटीशी बाग

भाविक, पर्यटकांसाठी महत्त्वाचे -
१) नदी पुलावरून मंदिराकडे जाताना काळजी घ्यावी
२) कठड्यावर उभे राहून सेल्फी काढणे टाळावे
३) नदीच्या पाण्यात जाणे कटाक्षाने टाळावे
४) मंदिरासमोरील पुलावरून फोटो काढताना काळजी घ्यावी
५) मंदिर आवारात धांगडधिंगा करू नये
६) स्वच्छता राखावी, मंदिराचे पावित्र्य जपावे

कसे याल -
१) पुणे, हडपसर व इतर ठिकाणांहून येण्यासाठी पीएमपी व एसटी बसची सासवडपर्यंत सुविधा
२) खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांनीही दिवे, बोपदेव, चिव्हे, शिंदवणे व माळशिरस या घाट मार्गे सासवडला येता येते.


मदतीसाठी संपर्क
सासवड पोलिस स्टेशन - ०२११५- २२२३३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT