पुणे

उद्योगनगरीतील प्रवाशांची रेल्वेसाठी फरफट

CD

रेल्वे विभागाचा कोट मागवला आहे. बातमी तात्पुरत्या स्वरुपात रेडी आहे.

पिंपरी, ता. १ : चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला जात नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बऱ्याचवेळा प्रवाशांना पुणे स्टेशनला जावे लागत आहे. प्रवाशांची फरफट थांबवण्यासाठी प्रशासनाने चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी होत आहे.

पिंपरी चिंचवड शहराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे देशातील आणि राज्यातील विविध भागातील नागरिक रोजगारानिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. शहराचा विस्तार पाहता शहरात सर्व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या थांबतील, असे एकही स्थानक नाही. पुणे-लोणावळा मार्गावरुन दररोज ७९ एक्स्प्रेस धावतात. मात्र, यापैकी केवळ नांदेड-पनवेल, सिंहगड एक्स्प्रेस, दौंड-इंदूर, कोयना एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी एक्स्प्रेस या पाच रेल्वे गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. पण, यातील बहुतांश एक्स्प्रेसची वेळ सोयीस्कर नाही. तर काही एक्स्प्रेस एक, दोन किंवा चार दिवसाआड धावतात. त्यामुळे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना पर्यायी एक्स्प्रेस किंवा पाच एक्स्प्रेस व्यतिरिक्त इतर एक्स्प्रेस पकडण्यासाठी पुणे किंवा लोणावळा स्थानकांवर जावे लागते. एक्स्प्रेसने रात्री अपरात्री आल्यावर शहरात येण्यासाठी आठशे ते बाराशे रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पिंपरी किंवा चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पण, याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, ना प्रशासनाचे. प्रत्येक वेळी प्रवाशांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.

पुणे स्थानकावरील ताण कमी होईल
पुणे स्थानकावर ७९ एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे. तसेच येथून पुणे-लोणावळा लोकलच्या ३४ फेऱ्या आणि पुणे-दौंड डेमूच्या आठ फेऱ्या होतात. पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर रेल्वे स्थानक विकासित केले असून काही एक्स्प्रेस सोडण्यात येत आहेत. पण, हडपसरहून पुणे किंवा पिंपरी शहरांत येण्यासाठी लोकल ट्रेन उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांनीच यावे लागते. हडपसरहून येताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जात आहे. त्यामुळे प्रशासनाने चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेसला थांबा दिल्यास पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

चिंचवड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास
‘अमृत भारत’ स्थानक योजनेअंतर्गत २०.४० कोटी रुपये खर्चून चिंचवड रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या अंतर्गत दोन लिफ्ट, एस्कलेटर (स्वयंचलित जिने), प्रशस्त प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, डिजिटल माहितीफलक, डिझाइन केलेले चिन्ह, पदपथ, सुनियोजित पार्किंग उभारण्यात येत आहे. त्यामुळे आता या स्थानकावर एक्स्प्रेसला थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा पुण्यातून किंवा हडपसरहून सुटणाऱ्या किंवा मुंबईहून येणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी किंवा उतरल्यानंतर पुणे व हडपसर स्टेशनला जाण्याची व येण्याची काहीच सोय नाही. त्यामुळे चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेला थांबा देण्यात यावा किंवा पुण्यातून सुटणाऱ्या काही गाड्या चिंचवडवरून सोडण्यात याव्यात.
- श्रीराम हरे, प्रवासी

पुणे-हरंगुळ गाडी चिंचवड स्टेशनहून सोडण्यासंदर्भात मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीचा विचार करावा.
- सुहास होनराव, प्रवासी

कोकणासह, हैदराबाद, सोलापूर, बंगळूर, चेन्नईकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला पाहिजे. आज पुणे रेल्वे स्थानकावर मोठा ताण येत असून प्रवाशांना उभे राहण्यासाठी देखील जागा गर्दीच्या वेळी उपलब्ध होत नाही. चिंचवडला थांबा दिला, तर पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. येथील प्रवाशांचा वेळ, पैसा, शारीरिक कष्टही वाचतील.
- गुलाम अली भालदार, अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

शहराची माहिती
लोकसंख्या - ३० लाखांवर
रेल्वे स्थानके - ५
लोकल फेऱ्या - ४२
एक्स्प्रेसला थांबा - ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Mumbai News: टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण, २०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT