पुणे

मोसे खोऱ्यात जनावरांना अज्ञात रोग

CD

पिरंगुट, ता. २१ : मुळशी तालुक्यातील मोसे खोऱ्यात अज्ञात रोगाने जनावरांचा मृत्यू झाला असून, गेल्या महिन्याभरात आठ जनावरे दगावली आहेत. दुधवान व गडले या दोन गावांतील गायवर्गीय जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या केवळ आठवडाभरात सहा जनावरे दगावली असून, दोन जनावरे मृत्यूच्या वाटेवर आहेत. येथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पन्नास वर्षांपासून अशाप्रकारचा रोग या दिवसात जनावरांना होतो. हा कोणत्या प्रकारचा रोग आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. जनावरांना अचानक थकवा येतो. रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पायातील बळ नाहीसे होते. त्यांना बसल्यावर पुन्हा उठता येत नाही. त्यातच काही जनावरे एक दिवसांत, काही जनावरे दोन दिवसांत; तर काही जनावरे पाच ते सहा दिवसांत प्राण सोडतात.
येथील धोंडिबा रामचंद्र कचरे यांच्या दोन गायी, विठ्ठल सामाजी मरगळे, सखाराम मरगळे यांची प्रत्येकी एक गाय, कोंडिबा रामचंद्र कचरे तसेच रामभाऊ ढेबे यांच्या दोन गायी यांचा मृत्यू झाला आहे. सुरेश सामाजी मरगळे यांच्या बैलाला; तर देवजी रामचंद्र मरगळे यांच्या गायीला गेल्या दोन दिवसांपासून या अज्ञात रोगाची लागण झाली असून, त्यांची अवस्था बिकट आहे.

आडमाळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा पदभार असलेले पशुधन पर्यवेक्षक संदीप चौधरी यांना संतोष मरगळे यांनी याबाबतीत कळवले आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी चौधरी हे प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थिती बघतील. आजारी जनावरांवर उपचार करतील. आवश्यकता असल्यास लसीकरणसुद्धा करतील. आमचा पशुवैद्यकीय विभाग या घटनेबाबत सतर्क झाला असून, तेथील परिस्थितीची तातडीने पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- डॉ. सचिन काळे, तालुका पशूधन वैद्यकीय अधिकारी, मुळशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT