पिरंगुट, ता. २६ : घोटावडे फाटा (ता.मुळशी) येथील बेवारस मजूर रघू वाघमारे (वय ४५) याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २३) कासार आंबोली येथे घटना घडली.
वाघमारे यांच्या नातेवाइकांचा तसेच त्याचा राहण्याचा पत्ता उपलब्ध झालेला नाही.याबाबत पौड पोलिस ठाण्याच्या हवालदार अनिता रवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , बुधवार (ता. २३) या दिवशी मयत रघू वाघमारे याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच तो मृत्यू पावला. त्याचा पत्ता तसेच नातेवाइकांचा शोध घेण्यात येत आहे. त्याचा रंग सावळा, चेहरा उभट, डोळे काळे, नाक सरळ, अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर निळसर रंगाची डिझाईन, रंगीबेरंगी लुंगी, कमरेला करगोटा आहे. त्याला ओळखाणारांनी तसेच नातेवाईकांनी पौड पोलिसांशी ७५२२९९०१०० व ९१३०५४१०२६ या क्रमांकांवर साधावा, असे आवाहन केले आहे.