पुणे

पशुपालन व्यवसायाला चालना

CD

पिरंगुट, ता. १ : राज्य शासनाने पशुसंवर्धन व्यवसायास ‘कृषी समकक्ष दर्जा’ देण्यास मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाला असून राज्यातील सुमारे ६० लाख पशुपालकांना त्याचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील पशुपालक संघटनांच्या या मागणीचा ‘सकाळ’ने गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. शासनाच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्राला मिळणारे सर्व लाभ पशुपालन व्यवसायाला मिळणार आहे.
राज्यात २० व्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन १,३९,९२,३०४ व म्हैसवर्गीय पशुधन ५६,०३,६९२ असे एकूण १,९५,९५,००० इतके पशुधन आहे. राज्यात पशुपालन व्यवसायापासून सुमारे ६० लक्ष कुटुंबे अर्थार्जन करीत आहे. सर्वसाधारणपणे १०,००० मांसल पक्षी व २५,००० अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुट उद्योगाला लघु, तर २५,००० मांसल कुक्कुट पक्षी ५०,००० अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुट उद्योगाला मध्यम स्वरूपाचा व्यवसाय समजले जाते. तसेच ५० दुधाळ जनावरांचा गोठा, २०० शेळी-मेंढी गोठा, १०० पर्यंतच्या वराह पालन व्यवसाय यास लघु स्वरूपाचा व्यवसाय समजण्यात येते. तर, १०० दुधाळ जनावरांचा गोठा, ५०० शेळी/मेंढी गोठा आणि २०० पेक्षा जास्त वराह पालन करणे, याला मध्यम स्वरूपाचा व्यवसाय समजण्यात येते.

खालील प्रकल्प क्षमतेच्या पशुपालक कृषी समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभास पात्र ठरणार आहेत.
- २५,००० पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी/ ५०,००० पर्यंत अंड्यावरील कुक्कुट पक्षी क्षमता.
- ४५,००० पर्यत क्षमतेच्या हॅचरी युनिट.
- १०० पर्यत दुधाळ जनावरांचा गोठा.
- ५००पर्यंत मेंढी/शेळी गोठा.
- २०० पर्यत वराह.


पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे लाभ मिळणार आहेत.
- २५,००० पर्यत मांसल कुक्कुट पक्षी/५०,००० पर्यंत अंड्यावरील कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच ४५,००० पर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसाय, १०० पर्यंत दुधाळ जनावरे संगोपन, ५०० पर्यत मेंढी/शेळी पालन व २०० पर्यत वराह या पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी "कृषी इतर" या वर्गवारीनुसार न करता "कृषी" वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल.
- कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौरऊर्जा पंप व इतर सौरऊर्जा संच उभारण्यास कृषी व्यवसायास देण्यात येणाऱ्या दराने अनुदान/सवलत देण्यात येईल.
- पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसायास ज्यादराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दराने व राज्यभरात समान दराने ग्रामपंचायत कर आकारणी करण्यात येईल.
- पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी "पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना" च्या धर्तीवर व इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज दरात ४% पर्यंत सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे.


या निर्णयासाठी आमची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत होती. ‘सकाळ’ माध्यम समूहाने या मागणीसाठी वारंवार प्रसिद्धी दिल्याने मागणीला बळ मिळाले. या निर्णयामुळे पशुपालकांना आता कृषीप्रमाणेच वीज दर, सौरऊर्जेसाठी अनुदान, ग्रामपंचायत कर, शेती कर्जाच्या व्याज दराप्रमाणेच व्याज दर आकारणी आदी सवलती मिळणार आहे.
- शरद गोडांबे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था...', ट्रम्प यांच्या डेड इकॉनॉमीच्या टीकेनंतर PM मोदींचं मोठं विधान

Top 5 Stock Picks: शेअर बाजार कोसळला तरी हे 5 शेअर्स ठरू शकतात 'Profit Machine'! तज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

Karjmafi Explained: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागची खरी गोष्ट... सोप्या भाषेत!

Education Minister : शिक्षणमंत्री पडले बाथरूममध्ये, मेंदूत आढळल्या रक्ताच्या गुठळ्या, प्रकृती गंभीर; राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण

टीआरपी यादीत मोठा बदल! 'घरोघरी मातीच्या चुली'ठरली सगळ्यांच्या वरचढ, तर झी मराठीच्या मालिकेची टॉप १० मध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT