पिरंगुट, ता. २७ : घोटावडे (ता. मुळशी) येथील मुकाईमाता नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात माधुरी लामखडे दुचाकीच्या मानकरी ठरल्या. तालुका मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोडांबे यांच्या पुढाकारातून येथील बापूजीबुवा तरुण मंडळ गोडांबेवाडी नंबर एक आणि घोटवडे ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. बाराशेहून अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
यावेळी दांडिया, होम मिनिस्टर, लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आल्या. होम मिनिस्टर कार्यक्रमात अभिनेत्री ज्योती शेतसांडी, अभिनेते अक्षय खंडागळे, अवधूत कुलकर्णी यांचा सहभाग होता.
लकी ड्रॉ बक्षिसाच्या मानकरी - कंसात बक्षिसाचे स्वरूप - प्रथम क्रमांक माधुरी लामखडे (दुचाकी), द्वितीय कीर्ती धुमाळ (फ्रीज), तृतीय मनीषा कुंभार (वॉशिंग मशीन) याशिवाय १३ मिक्सर, १३ ओव्हन, १३ टेबल फॅन आणि सहभागी महिलांना भेटवस्तू घरपोच देण्यात आल्या. दोन दिवस नारी सन्मान हा उपक्रम राबविण्यात आला. माजी उपसभापती सारिका मांडेकर यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी तर आभार सुधीर गोडांबे यांनी मानले.