पुणे

शेवंती फुलांमुळे २४ गुंठ्यांत सहा लाखांची लॉटरी

CD

परिंचे, ता. २४ : परिंचे (ता.पुरंदर) येथील संतोष सोपान शेडगे व वैशाली शेडगे यांनी २४ गुंठ्यांत यंदा शेवंतीच्या फुलांची शेती केली. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विक्रमी बाजारभाव व गुणवत्ता पूर्ण फुलांमुळे मागील तीन महिन्यांत त्यांना सहा लाख रुपयांच्या उत्पन्नाची लॉटरी लागली आहे. फुलांचा मळा फुलविण्यासाठी घेतलेल्या कष्टाला नवदुर्गा पावल्याची भावना शेडगे दांपत्याकडून व्यक्त होत आहे.

वैशाली शेडगे या परिंचे गावच्या माजी सरपंच आहेत तर पती संतोष हे वडिलोपार्जित शेती करत आहेत. गिरणी कामगार असलेले वडील गिरणी बंद झाल्यावर गावाला येऊन शेती करायला सुरुवात केली. ते वयोवृद्ध झाल्यावर संतोष शेडगे यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यावेळी कधी अस्मानी संकट, कधी रोगराई तर कधी पडलेले बाजारभाव यामुळे शेती कायम तोट्यात जात होती. दूध व्यवसायावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. मुलांची शिक्षण तसेच कुटुंबाचा गाडा कसाबसा चालत होता. दरम्यान, त्यांनी कांद्याच्या मिळालेल्या भांडवलातून फूल शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नीरा (ता . पुरंदर) येथील कृषी सल्लागार रोहित जगताप यांचे मार्गदर्शन घेतले. दरम्यान, वडील सोपानराव व आई रंजना यांची मोलाची साथ मिळाल्याचे संतोष शेडगे यांनी सांगितले.

अशी केली फूल शेती
१. शेवंती लागवडीसाठी मुरमाड जमिनीची निवड
२. नांगरट करून दोन वेळा कुळवाच्या पाळ्या जमीन तयार केली.
३. पाच ट्रॉली शेणखत सम प्रमाणात पसरून घेतले
४. तीन फूट रुंदीची सरी काढून त्यावर ठिबक सिंचन अंथरले
५. भाग्यश्री व्हाइट शेवंती रोपांची निवड
६. २४ गुंठ्यांत पाच हजार रोपांची लागवड केली.


बुरशीनाशके, कीटकनाशके रोपांची निरोगी वाढ
वेळोवेळी घरच्या घरी आंतरमशागत केल्याने खर्चात बचत झाली योग्य वेळी रासायनिक खत व सुक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर केला. वातावरणातील बदल व झाडांची स्थिती पाहून बुरशीनाशके व कीटकनाशके रोहित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वापरली. त्यामुळे संपूर्ण रोपांची निरोगी व जोमदार वाढ झाली.

पहिल्या पंधरवड्यात निघाला उत्पादन खर्च
शेवंती फुलविण्यासाठी २४ गुंठे क्षेत्रासाठी सुरुवातीपासून ९० हजार रुपये खर्च आला. तीन महिन्यात फूल धारणा सुरू झाली सुरुवातीला कमी प्रमाणात माल निघाला. नंतर फुलांचे प्रमाण वाढले बाजारभाव तेजीत असल्याने पहिल्या पंधरवड्यात उत्पादन खर्च निघाला. तीनशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे फुलांना बाजारभाव मिळाल्याने पाच महिन्यांत सहा लाखांचे उत्पन्न मिळाले, असे वैशाली शेडगे यांनी सांगितले.


सध्या दररोज शंभर किलो फुले बाजारात जात असून, नवरात्रीमुळे अधिक मागणी आहे. दिवाळी मध्ये फुलांना मोठी मागणी असते अजून दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. शेती ही लॉटरी सारखी असून वीस वर्षांत मला पहिल्यांदाच लॉटरी लागली आहे
- संतोष शेडगे, फूल उत्पादक


02779, 02781

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Sanjana Jadhav : ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा

Avocado Health Benefits: व्हिटॅमिन बी, सी अन् इ ने भरपूर ऍव्हाकाडो फक्त चवीला नाही, तर आरोग्य आणि सौंदर्यासाठीही आहे खास

बॉलिवूडच्या 'या' हॉरर चित्रपटाची कॉपी आहे स्टार प्रवाहची 'काजळमाया' मालिका? तरुणाईला लावलेलं वेड; गाणीही प्रचंड गाजलेली

Artemis II Mission : चाँद पर नाम लिख दूं! तुमच्या प्रिय व्यक्तीचं नाव पाठवा चंद्रावर, नासाने आणली ऑफर

Ajit Pawar Solapur Daura: दूध उत्पादक शेतकऱ्याची दादांकडून विचारपूस | Sangoba | Solapur | Sakal News

SCROLL FOR NEXT