परिंचे, ता. २८ : परिंचे (ता. पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तहसीलदार पुरंदर, तसेच सर्व शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २४) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये सर्व विभागाच्या मिळून जवळपास १३८१ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, दिलीप यादव, समीर जाधव, सरपंच पुष्पलता नाईकनवरे उपस्थित होते.
‘महाराजस्व’ अभियान समाधान शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी,वन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलिस, पशुधन, पाटबंधारे, महावितरण, सहकार, महिला व बालकल्याण, परिवहन, पुरवठा आदी विभागांचा समावेश केला होता. शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थींना आमदार शिवतारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश देण्यात आले.
यावेळी आमदार शिवतारे यांनी लाडकी बहीण योजना चालू राहण्यासाठी अंगणवाडी सेविका तसेच, सर्व कर्मचारी यांना आव्हान केले. तसेच, जे कर्मचारी शंभर १०० टक्के लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण करतील अशा कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
कार्यक्रमासाठी अजित जाधव, नितीन कुंजीर, हरिभाऊ लोळे, सागर करवंदे, धनंजय यादव, नितीन यादव, प्रवीण जगताप, विजय साळुंखे, सोपान राऊत, मनीषा जाधव, विवेक दाते उपस्थित होते.
02785
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.