पुणे

मुळशीतील चिमुरड्यांनाही डिजिटल शिक्षणाची सुविधा

CD

पौड, ता. ९ : चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्यावतीने मुळशी तालुक्यातील १५ शाळांना ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोळवणच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संगणक संचासह ई- लर्निंग किटचे वितरण करण्यात आले. या सुविधेमुळे मुळशीच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील चिमुरडेही आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार वाचन लिखाणाबरोबरच आधुनिक दर्जाचे डिजिटल शिक्षण घेणार आहे.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सुलभता आणण्याच्या दृष्टिकोनातून चैतन्य सॉफ्टवेअर आणि रोटरीच्यावतीने तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील १४ आणि भुकूमच्या खाटपेवाडीच्या जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग सॉफ्टवेअर आणि संगणक संच वितरित करण्यात आला. त्याच्या वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सहसचिव माणिक बांगर, चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संचालक संजय देशपांडे, प्रज्ञा देशपांडे, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष उदय धर्माधिकारी, प्रेसिडेंट इलेक्ट ब्रिगेडियर राजा, सभासद नरेंद्र संघवी, योगेश शहा, विष्णू नराम, केंद्रप्रमुख मधुकर येनपुरे, लवळे शाळेचे मुख्याध्यापक संजय मारणे, यशवंत पासलकर, चिखलगावचे सरपंच किरण फाले, पौड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ धिडे, ज्ञानेश्वर धिडे, सुमन साठे, सुनीता घाटे, मारुती शेडगे, उषा दाभाडे, संदीप दुर्गे आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना तंत्रज्ञान प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम चैतन्य सॉफ्टवेअर रोटरी क्लबच्या मदतीने अनेक वर्षे करत आले आहे. त्यांच्या या योगदानाचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार बांगर यांनी काढले.

बदलत्या काळात विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन संघवी यांनी केले, तर शिक्षकांनी शाळेस मिळालेल्या ई-लर्निंग साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवून आणावा, असे येनपुरे यांनी आवाहन केले.

कोळवणच्या मुख्याध्यापिका ज्योती चौधरी यांनी आभार मानले.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT