पुणे

पौड ग्रामीण रुग्णालयात अडचणींचा डोंगर

CD

बंडू दातीर

पौड : येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या पाहता मर्यादित सुविधा, डॉक्टरांची अपुरी संख्या आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव यामुळे नागरिकांना काही बाबतीत अडचणींचा सामना करावा लागतो. याठिकाणी आयसीयू शस्त्रक्रियांची सुविधा नाही, त्यामुळे रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे.
मुळशी तालुक्यातून कोकणात जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होतात. अशावेळी पौड येथील ग्रामीण रुग्णालयात आपत्कालीन सुविधा नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांना तालुक्यातील इतर खासगी किंवा पुण्यात पुढील उपचारासाठी पाठवावे लागते. आपत्कालीन सेवा, सोनोग्राफी यासाठी रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागते. खासगी रुग्णालयातील खर्चाचा भार पाहता, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचे रुग्णालयातील उपचारापोटी आर्थिक गणित कोलमडते. खासगी रुग्णालयात सरकारी योजनांचा पुरेसा लाभ रुग्णांना मिळत नाही.
पौड हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. मुळशी धरण भाग, माले, कोळवण, रिहे, मुठा, मोसे खोऱ्यातील अनेक गावांतील कानाकोपऱ्यातील रुग्णांसाठी हे ग्रामीण रुग्णालय एक वरदान ठरले आहे. तालुक्यात इतर तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून नोकरी, व्यवसायासाठी अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे स्थानिक मुळशीकरांबरोबरच इतर रुग्णही याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. याठिकाणी दररोज २०० ते २५० रुग्ण तपासले जातात. येथे आंतररुग्णांसाठी ३० बेडची सोय आहे. लुपिन, रोटरी सारख्या विविध सामाजिक संस्थांचे या रुग्णालयाला, रुग्णांना सहकार्य असते. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना निवासासाठीही इमारत उभारलेली आहे. दरम्यान, या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास अधिक तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा सुविधा, आयसीयू, शस्त्रक्रिया विभाग, मातृत्व व बालरोग विभाग यांसह आवश्यक उपकरणे मिळू शकतील. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात न जाता दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवरच मिळू शकतील. मोठमोठ्या शस्त्रक्रिया होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा याचीही बचत होऊ शकते.

या सोयीसुविधा
रक्ताच्या विविध तपासण्या मोफत
एक्सरेची सुविधा
शवविच्छेदनाचीही सोय
क्षयरोग, एचआयव्ही रुग्णांना मोफत औषधोपचाराबरोबरच समुपदेशनही केले जाते
गर्भवतींचीही गरोदरपणाच्या काळात काळजी घेतली जाते
सर्पदंश, श्‍वानदंशावर लसही उपलब्ध


पौडच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन त्यास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी तीन महिन्यांपूर्वीच प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. याठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांसह १०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल करण्यासाठी शासनपातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
- शंकर मांडेकर, आमदार

4426

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT