पौड ता. ५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी मुळशी तालुक्यात ठिकठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. दोन दिवस अस्थिकलशाचे दर्शन घेताना अनेकांचा कंठ दाटून आला होता. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अजित पवार अमर रहेच्या घोषणा दिल्या.
हा अस्थिकलश सजवलेल्या रथात ठेवला होता. रथात अजित पवार यांची प्रतिमाही मांडण्यात आली होती. पहिल्या दिवशी चांदे (ता. मुळशी) येथे आमदार शंकर मांडेकर यांच्या निवासस्थानी कलशाचे पूजन झाले. दादांना श्रद्धांजली वाहताना युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर भावुक झाले. चांदे येथून हा रथ रिहे खोऱ्यातील विविध गावात गेला. त्यानंतर हिंजवडी, मारूंजी या भागातही विविध ठिकाणी नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
दुसऱ्या दिवशी भूगाव, पिरंगुट गाव तसेच अनंतराव पवार महाविद्यालयात कलश नेण्यात आला. त्यानंतर खारावडे, घोटावडे फाटा, सुतारवाडी येथे कलशाचे दर्शन लोकांनी घेतले. कोळवण, कुळे, येथेही दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. पौडच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष पेरणेकर यांनी अजितदादांच्या स्वभाववैशिष्ठ्यांचे आणि केलेल्या कामांची महती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनीही अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या. प्रत्येक ठिकाणी अजितदादांच्या भाषणांच्या, एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या ऑडिओ क्लिपही यावेळी लोकांना ऐकविण्यात आल्या.
सांयकाळी मुळशी धरणात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, माजी सभापती रवींद्र कंधारे, सुखदेव मांडेकर, संतोष कानगुडे, संतोष ढोरे, संपत दळवी, प्रकाश वाघ, अमित मोरे, करण बलकवडे आदी उपस्थित होते.
04666
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.